Mumbai Crime 
मुंबई

Mumbai : पावसाळ्यात मध्य रेल्वेचे देशी जुगाड! हार्बर रेल्वे स्थानकांना बांबूच्या मंडपाचा आधार

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मान्सूनने मुंबई- उपनगरात दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे उपनगरीय रेल्वे स्थानकांच्या प्लॅटफार्मवरील प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला. अनेक स्थानकात छताच्या दुरुस्तीचे काम अद्यापही पूर्ण झाल्या नसल्याने प्रवाशांना छत्री घेऊन स्थानकांत उभे राहावे लागत आहे.

त्यामुळे आता रेल्वे प्रवाशांची पावसात भिजू नयेत म्हणून मध्य रेल्वेने देशी जुगाड केला आहे. हार्बर मार्गावरील गोवंडी रेल्वे स्थानकात बांबूच्या मंडप टाकण्यात येत आहे. त्यामुळे प्रवाशांनी रेल्वेचा कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे.

मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील गोवंडी स्थानकांवरून दररोज ५० हजार पेक्षा जास्त प्रवासी प्रवास करतात. दररोज या स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत जात आहे. परंतु प्रवाशांचा सोयीसाठी सुविधेचा अभाव आहे. दिव्यांग आणि वरिष्ठ नागरिकांसाठी या स्थानक लिफ्ट आणि सरकते जिने नाही.

अस्वच्छ फलाट, तुटलेले जिने आणि उखडलेले पूल आदी गोष्टींमुळे या स्थानकाला अवकळा आली आहे. त्याशिवाय या स्थानकांवर गेल्या अनेक महिन्यापासून देखभाल दुरुस्तीचे कारण समोर करून छत नाही. त्यामुळे उन्हाळ्यात प्रवाशांना उन्हाचे चटके प्रवाशांना सहन करावे लागत होते.

यांसंदर्भात अनेकदा न्यू संगम वेल्फेअर सोसायटीनी रेल्वेकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर रेल्वेने मे महिन्यापर्यंत सरकते जिने, लिफ्ट आणि रेल्वे स्थानकांवर छत लावून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र. प्रत्येक्षात पावसाळा आला तरी छत लावण्याचे काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे गोवंडी रेल्वे स्थानकांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना छत्री घेऊन प्रवास करावा लागत आहे.

तात्पुरता देशी जुगाड

मध्य रेल्वेने आता पावसाळ्यात गोवंडी रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना आसरा मिळावा म्हणून प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी तात्पुरता देशी जुगाड लावला आहे. बांबूच्या मंडप टाकून बांबूच्या साहाय्याने ताडपत्री बसविण्याचे काम सुरु केले आहे. यामुळे रेल्वे प्रवाशांना पावसापासून सुरक्षा तर मिळेल. मात्र, प्लॅटफॉर्म चालताना प्रवाशांना अडचणी येणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा सुरक्षिततेशी रेल्वे खेळत असल्याचे दिसून येते.

पावसाळ्यात गोवंडी स्थानकांवर प्रवाशांना आसरा मिळावा म्हणून तात्पुरते शेड उभारण्यात येत आहे. या ठिकाणी जुना पादचारी पूल होता. तो पूल तोडण्यात आला आहे.

- डॉ. शिवराज मानसपुरे, मुख्य जनसंपर्क अधिकारी,मध्य रेल्वे

गोवंडी स्थानकांवर सरकते जिने आणि लिफ्ट नाही. त्यामुळे वयोवृद्ध प्रवाशांना फलाटावर पोहचण्यासाठी अडचणीचा सामना करावा लागत आहे. याशिवाय अनेक दिवसापासून स्थानकावरील छत नाही. यांसंदर्भात आम्ही रेल्वेकडे तक्रार केली होती. रेल्वेने मे २०२३ पर्यत जिने,लिफ्ट आणि छत बसून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र पावसाळा आला तरी या तिन्ही गोष्टी पूर्ण झालेल्या नाही. आता तात्पुरते शेड उभारून प्रवाशांच्या सुरक्षिततेशी खेळत आहे.

- शेख फैयाज आलम, अध्यक्ष, न्यू संगम वेल्फेअर सोसायटी गोवंडी

मुंबईकरांची गैरसोय

मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर उन्हाळ्यापासून सुरू असलेल्या छताच्या दुरुस्तीचे काम अद्यापही सुरू असल्याने प्रवाशांनी पावसापासून आसरा घेण्यासाठी पादचारी पुलांच्या पायऱ्यांवर धाव घेतली. अनेक स्थानकांत छत दुरुस्तीचे काम पूर्ण झाले नाही.

त्यामुळे आज प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. पश्चिम रेल्वेच्या मीरा रोड स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर छत नसल्याने प्रवाशांना छत्री घेऊन स्थानकावर ट्रेनची प्रतीक्षा करावी लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे रेल्वेचा कारभारावर मुंबईकरांकडून नाराजी व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT