nair hospital
nair hospital sakal media
मुंबई

'या' आजाराने ग्रस्त झालेल्या मुलांना कोट्यावधींचे इंजेक्शन्स आयुष्यभर मोफत

भाग्यश्री भुवड

मुंबई : मुंबई सेंट्रल (Mumbai central) स्टेशनजवळील टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज (topiwala medical college) आणि बीवायएल नायर रुग्णालयाला (nair hospital) शंभर वर्ष पूर्ण झाले (100 years completed) आहे.  या वर्षाच्या निमित्ताने रुग्णालयातर्फे अनेक कार्यक्रम (event) आयोजित केले जाणार आहेत. यावेळेस नायर रुग्णालय 17 मुलांना नवीन जीवन (news life) देणार आहे. (Mumbai central-topiwala medical college-nair hospital-event-new life-nss91)

ही अशी मुले आहेत जी स्पाइनल मस्क्युलर एट्रोफी (Spinal Muscular Atrophy) नावाच्या अनुवांशिक आजाराने ग्रस्त आहेत. या रोगामुळे शरीराची शक्ती संपते. या आजाराच्या उपचारासाठी, कोट्यवधी रुपयांचे प्रभावी इंजेक्शन्स या मुलांना आयुष्यभर मोफत देऊन नवीन जीवन दिले जाणार आहे. 1921 मध्ये सुरू झालेले नायर रुग्णालय आता 100 वर्षांचे झाले आहे. यानिमित्त रुग्णालयात अनेक सामाजिक कार्यक्रम होणार आहेत, ज्याचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे.

या कार्यक्रमात 17 मुलांना नवीन जीवदान देण्याच्या कार्यक्रमाचेही उद्घाटन केले जाईल. नायर रुग्णालयाच्या बालरोग विभागाच्या प्रमुख डॉ.सुषमा मलिक यांनी सांगितले की, ही 17 मुले स्पाइनल मस्क्युलर एट्रोफी या दुर्मिळ आजाराने ग्रस्त आहेत. मलिक यांच्या मते, हा रोग पाठीच्या कण्यातील मोटर पेशींवर परिणाम करतो, ज्यामुळे शरीराची शक्ती संपते. हळूहळू चालणे, बोलणे, अन्न खाणे आणि अगदी श्वास घेणे सुद्धा कठीण होते.

10 हजार मुलांपैकी एकाला हा आजार होतो. या आजारांच्या उपचारांची किंमत खूप जास्त आहे जी सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर आहे. या आजारासाठी बायोजेन कंपनीकडून प्रभावी इंजेक्शन 'स्पिनराज' या मुलांना आयुष्यभर मोफत दिले जाईल. यासाठी अमेरिकास्थित एनजीओ डायरेक्ट रिलीफ रुग्णालयाला मदत करत आहे. डॉ. मलिक यांनी सांगितले की, हे इंजेक्शन देण्यासाठी डाॅ. अल्पना कोंडेकर या समन्वयकाचे काम करतील. या इंजेक्शनमुळे मुलांना रोगामुळे होणाऱ्या अस्वस्थतेपासून आराम मिळण्यास मदत होईल.

पहिल्या वर्षाचा खर्च 6 कोटी

पहिल्या वर्षी प्रत्येक मुलाला 7 इंजेक्शन्स देण्यात येतील, ज्याची किंमत 6 कोटी रुपये असेल. यानंतर, दरवर्षी 4 इंजेक्शन्स दिली जातील, ज्याची किंमत 3.2 कोटी असेल असेही डाॅ. मलिक यांनी साांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunita Williams: सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी तुर्तास स्थगित; या कारणासाठी मोहीम पुढे ढकलली

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. प्रणिती शिंदे, आदिती तटकरे, शाहू महाराजांनी केलं मतदान

PM Modi Viral Video: "मला माहीत आहे 'डिक्टेटर' यासाठी अटक करणार नाही," ट्रोल होऊनही पंतप्रधानांचे भन्नाट उत्तर

काँग्रेसच्या प्रयत्नांवर वडेट्टीवारांनी पाणी फेरले, निवडणूक संपेपर्यंत शांत बसण्याचे निर्देश

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

SCROLL FOR NEXT