Meaning of Dreams
Meaning of Dreams Sakal
मुंबई

Mumbai : सर्पदंशामुळे कल्याणमधील मुलाचा मृत्यु

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - कल्याणमधील एका पंधरा वर्षीय मुलाला सर्पदंश झाला असता उपचारा दरम्यान त्याचा मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. अमित सोनकर असे मृत मुलाचे नाव असून केडीएमसीच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात आले,

मात्र त्याची प्रकृती खालावली. पुढील उपचारासाठी त्याला कळवा येथील सरकारी रुग्णालयात हलविण्यात आले असता तेथे अमितची प्राणज्योत मालवली आहे. पालिकेने उपचारात हलगर्जीपणा केल्याचा आरोप मृत अमितच्या नातेवाईकांनी केला आहे. यावर पालिका प्रशासनाने अमितवर योग्य औषधोपचार करण्यात आले होते. परंतु त्याची प्रकृती खालावल्याने अतिदक्षता विभागात त्याच्यावर पुढील उपचार व्हावेत यासाठी त्याला कळवा येथे हलविण्यात आल्याचे सांगितले.

कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरात अमित सोनकर राहत होता. शाळेला सुट्टी असल्याने बुधवारी तो वडिलांच्या ज्यूस सेंटरवर गेला होता. दुपारी 3 च्या सुमारास अमितला एका सापाने दंश केला. त्याला तात्काळ पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार तेथे करण्यात आले,

मात्र त्याची प्रकृती खालावल्याने त्याला पुढील उपचारासाठी कळवा येथील शिवाजी रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे उपचार सुरु असताना अमित याचा मृत्यु झाला. अमितच्या मृत्युनंतर त्याच्या नातेवाईकांनी अमितवर उपचारात हलगर्जीपणा करण्यात आल्याचा आरोप पालिका रुग्णालयावर केला आहे. याप्रकरणी रुक्मिणीबाई रुग्णालयाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी पुरुषोत्तम टिके यांनी सांगितले.

बुधवारी दुपारी अमित याला सर्पदंश झाल्याने त्याला रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याच्यावर योग्य ते औषधोपचार करण्यात आले. त्यावेळी त्याला न्यूरो टॉक्सिन पॉयझन असल्याचे लक्षात आले.

त्याला कृत्रिम श्वासोच्छवासाची यंत्रणा लागू शकते यामुळे त्याला कळवा येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले. तेथे त्याचा उपचारा दरम्यान मृत्यु झाल्याचे सांगितले. रुक्मिणीबाई रुग्णालयात सध्या अतिदक्षता विभागाची सुविधा नसल्याचे रुग्णास कळवा येथे हलविण्यात आले होते असे देखील त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : राजस्थान क्वालिफाय करणार की हैदराबाद मजबूत स्थितीत पोहचणार?

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

PPF : दररोज 250 रुपये वाचवून तयार होईल 24 लाखांचा फंड, कसा ते वाचा ?

Rinku Singh T20 WC 2024 : रोहितला जास्त पर्याय... रिंकू सिंहला वगळण्याबाबत अजित आगरकर काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT