मुंबई

मुंबईत पुन्हा हिट अँड रन, 23 वर्षीय तरुणी जागीच ठार..

सकाळ वृत्तसेवा

घरात कंटाळा आला म्हणून आपल्या दोन मैत्रिणींसोबत ती घराबाहेर पडली आणि होत्याचं नव्हतं झालं. मुंबईतील चुनाभट्टी परिसरात काल हा धक्कादायक अपघात घडलाय. या अपघातात एका 23 वर्षीय तरुणीला आपला जीव गमवावा लागलाय. अर्चना पार्टे असं या मृत तरुणीचं नाव आहे. चुनाभट्टी परिसरात राहणारी अर्चना पार्टे काल रात्री नऊ वाजताच्या सुमारास फूटपाथवरुन चालत होती. त्यावेळी भरधाव वेगात येणाऱ्या कारनं तिला उडवलंय.  

कार चालवणारा चालक दारूच्या नशेत असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. दरम्यान, या प्रकरणी अर्चना पार्टे हिच्या कुटुंबीयांना चुनाभट्टी पोलिस स्टेशनला घेराव घालत आंदोलन केलं. या प्रकरणी सर्व आरोपींना अटक केली जात नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा अर्चना पार्टेच्या नातेवाईकांनी आणि स्थानिक नागरिकांनी घेतलाय. या प्रकरणी आतापर्यंत तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय.

काल रात्री ९.०० च्या सुमारास अर्चना आणि तिच्या दोन मैत्रिणी घराबाहेर पडल्या. अर्चनाच्या दोन मैत्रिणी तिच्या मागे फुटपाथवर चालत होत्या. दरम्यान एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. एका भरधाव येणाऱ्या कार ने तिला धडक दिली. अपघातानंतर ती कार तशीच पुढे निघून गेली. यामध्ये अर्चनाने जागीच आपले प्राण गमावलेत.  

या अपघाताबद्दल बोलताना, कारमधील चारही तरुण मद्यधुंद असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. दरम्यान घडलेल्या भयानक प्रकारानंतर अर्चनासोबतच्या दोन्ही मैत्रिणींना मोठा मानसिक धक्का बसलाय. 

mumbai chunabhatti hit and run case twenty three years old girl lost her life

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT