CNG-PNG Price esakal
मुंबई

CNG-PNG Price : सीएनजी अन् पीएनजीच्या किंमतींमध्ये वाढ; मुंबईत नेमका दर किती?

मुंबई आणि आजूबाजूच्या शहरांमध्ये इतर सर्व टॅक्स मिळून सीएनजीचे सुधारित दर ७५ रुपये प्रतिकिलो आणि घरगुती वापराच्या पीएनजीचे दर ४८ रुपये प्रति एससीएम असतील.

संतोष कानडे

Mumbai Gas Price : दिल्लीनंतर मुंबईतही सीएनजीची किंमत १.५० रुपये प्रति किलोग्रॅम आणि पाईपद्वारे घरांमध्ये पोहोचणारा स्वयंपाकाचा गॅस अर्थात पीएनजीच्या किंमती एक रुपयाने वाढल्या आहेत. मुंबई आणि आजूबाजूंच्या शहरांमध्ये गॅस पुरवणाऱ्या महाराष्ट्र गॅस लिमिटेडने सांगितलं की, वाढलेल्या किंमती आठ आणि नऊ जुलैच्या मध्यरात्री लागू होतील.

कंपनीने म्हटलं की, सीएनजी आणि पाईपद्वारे वापरण्यात येणाऱ्या घरगुती नॅचरल गॅसचं वाढतं प्रमाण आणि घरगुती गॅस वाटप, यातील तफावतीमुळे एमजीएलला जादा भावाने नैसर्गिक गॅस खरेदी करावा लागतो. गॅसच्या किंमतीमध्ये झालेल्या अंशतः वाढीची भरपाई करण्यासाठी सीएनजीच्या किंमतीत १.५० रुपये आणि पीएनजीच्या किंमतीमध्ये १ रुपये एससीएम वाढवण्यात आलेलं आहे.

त्यामुळे आता मुंबई आणि आजूबाजूच्या शहरांमध्ये इतर सर्व टॅक्स मिळून सीएनजीचे सुधारित दर ७५ रुपये प्रतिकिलो आणि घरगुती वापराच्या पीएनजीचे दर ४८ रुपये प्रति एससीएम असतील.

दरम्यान, दिल्ली आणि आजूबाजूच्या शहरामध्ये सिटी गॅस परवानाधारक इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडने २२ जून रोजी दिल्लीत सीएनजीची किंमत एक रुपया प्रतिकिलोने वाढवून ७५.०९ रुपये केली होती. तर दिल्लीत पीएनजीच्या किंमतीत कोणतेही बदल केलेल नव्हते. दिल्लीत पीएनजी ४८.५९ रुपये प्रति एससीएम आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पश्चिम बंगाल, तामिळनाडू अन् आसामसह पाच राज्यात वाजवणार बिगुल, केंद्रीय निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद...

Income Tax Notice Scam : तुम्हालाही इन्कम टॅक्सची नोटीस आलीय ? आजिबात करु नका 'ही' चूक, होईल मोठे नुकसान

झाकीर खानची तब्येत बिघडली! मुंबईच्या लीलावती रुग्णालयात केलं भर्ती, नक्की झालं काय?

Uri Encounter: अफगाणिस्तानवर हल्ल्यानंतर पाकड्यांचा मध्यरात्री उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न, भारतीय सैन्याने जाग्यावरच केलं ठार!

धक्कादायक! आधीच टंचाई त्यात गॅस सिलिंडरची चोरी, ७६ चोरले पण फक्त १२ भरलेले...

SCROLL FOR NEXT