कोस्टल रोडला ‘कोस्टल वॉक’ची किनार sakal
मुंबई

मुंबई : कोस्टल रोडला ‘कोस्टल वॉक’ची किनार

वरळी ते नरिमन पॉइंटपर्यंतच्या सागरी किनारी मार्गाचे बांधकाम ५० टक्के पूर्ण

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : वरळी ते नरिमन पॉइंटपर्यंतच्या सागरी किनारी मार्गाचे बांधकाम ५० टक्के पूर्ण झाले असून नोव्हेंबर २०२३ पर्यंत हा मार्ग पूर्ण करण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे. या मार्गामुळे वाहतूक सुसाट होणारच आहे, त्याचबरोबर मुंबईतील सर्वांत मोठ्या किनारी पदपथासह पिकनिक स्पॉटही तयार करण्यात येणार आहे.

पालिका १२ हजार कोटी रुपयांचा खर्च करून हा १० कि.मी.चा मार्ग तयार करत आहे. यामुळे वरळी ते नरिमन पॉइंटपर्यंतचे अंतर १० ते १२ मिनिटांत कापता येईल. त्यासाठी १११ हेक्टर समुद्रात भराव टाकण्यात आला असून त्यातील ३६ टक्के हिस्सा हा नागरी सुविधांसाठी वापरला जाईल. वरळी-हाजीअली ते प्रियदर्शनी पार्क असा पदपथ तयार केला जात असून त्याचबरोबर सायकल ट्रॅक, खुले नाट्यगृह, उद्याने व खेळांची मैदाने, प्रसाधनगृहे इत्यादी बाबीही ‘कोस्टल रोड’सोबत विकसित करण्यात येणार आहेत, अशी माहिती ‘सागरी किनारा रस्ता’ प्रकल्पाचे प्रमुख अभियंता चक्रधर कांडलकर यांनी दिली.

मरीन ड्राईव्हचा विक्रम मोडणार

नेताजी सुभाषचंद्र बोस मार्गालगतचा मरीन ड्राईव्ह हा ३.५ कि.मी.चा सागरी पदपथ मुंबईतील सर्वांत मोठा सागरी पदपथ आहे; मात्र कोस्टल रोडचा पदपथ हा यापेक्षा दुप्पट लांबीचा ८.५ कि.मी. असेल. तसेच पदपथाची रुंदी तब्बल २० मीटर असेल, असे पालिकेकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026 : शेताच्या बांधावर अनवाणी धावणाऱ्या गुलवीर सिंगने राष्ट्रकुल स्पर्धेत इतिहास घडवला; ०.०४ सेकंदाच्या फरकाने जिंकले दुसरे पदक

Commonwealth Games 2026: ७ सुवर्ण, ३ रौप्य.. बॉक्सिंगपटूंची ऐतिहासिक कामगिरी; भारताची Medal Table मध्ये उत्तुंग भरारी, बघा कितव्या स्थानावर पोहोचले

Commonwealth Games 2026: सचिन... सचिन... पंचांनी १ गुण वजा केला, भारताचा बॉक्सर पेटला; तिसऱ्या फेरीत मुक्क्यांची बरसात करून जिंकले सुवर्ण...

Education Initiative: चिमुकल्या इरफानच्या आठवणीत अमळनेरमध्ये शिक्षणसेवेचा संकल्प; गरजू विद्यार्थ्यांना मोफत साहित्य वाटप उपक्रम

Commonwealth Games 2026: धक्कादायक... ऑलिम्पिक पदक विजेत्या लव्हलिना बोरगोहैनचे सुवर्ण हुकलं...

SCROLL FOR NEXT