lockdown file photo
मुंबई

मुंबईच्या कुलाबा कॉजवे आणि मेट्रो फॅशन स्ट्रीटच्या व्यावसायिकांकडून लॉकडाउनचे स्वागत

उद्धव ठाकरे यांचा लॉक डाऊनचा निर्णय योग्यच

दीनानाथ परब

मुंबादेवी - ‘कोई लौटा दे मेरे बीते हुये दिन’ को अशी ग्राहकांना साद घालत गत वर्षी(2020) सप्टेंबर मध्ये सुरु झालेल्या कुलाब्याच्या कॉजवे फॅशन मार्केट आणि मेट्रो फॅशन स्ट्रीटच्या स्टॉल मालकांनी करोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी सज्ज झालेल्या राज्य सरकारच्या लॉक डाऊनच्या निर्णयाचे स्वागतच केले असून करोना महामारी संपविण्याच्या लढाईत आमचाही सहभाग असल्याचे स्पष्ट करीत उद्धव ठाकरे यांच्याकडून मिळणाऱ्या 1500 रूपयांच्या मदतीबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले आहे.

मार्च 2020 पासून बंद असलेली कुलाबा कॉजवे मार्केट तसेच मेट्रोची फॅशन स्ट्रीट येथील व्यवसायिकांचा धंदा ग्राहकांविना 10-15 टक्क्यांवर आला होता. आपाल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याचे एकमेव साधन म्हणजे या स्टॉल धारकांचा वस्तु विक्रीचा व्यवसाय होय. कोविड संसर्गाचा जोर कमी होत असतांना मुंबई हळूहळू अनलॉक झाली. या काळात अनेक व्यवसाय खुले झाले होते.

कुलाबा कॉजवे येथील जवळपास 190 महिलांच्या सौंदर्यासाठी आवश्यक साहित्यासहित अन्य वस्तु विक्री स्टॉल्सचे मार्केट तसेच मेट्रो येथील 400 स्टॉल्सची फॅशन स्ट्रीट पुन्हा नव्याने आपला जम बसवित असतानाच अचानक गेल्या 15 दिवसांत करोनाची दुसरी लाट आली आणि सर्वच व्यवसायिक धास्तावले.

गेल्या तीन महिन्यात येथे ग्राहकांचीं अपेक्षित वर्दळ सुरु झाल्याने व्यवसायात जम बसत असल्याने व्यवसायिक खुशीत होते. इथे दगड, मणी, मोती, स्फटिक, शिंपले, हस्तिदंत, कुंदन, लाकडापासून ते शेकडो प्रकारची, रंगबिरंगी हजारो कानातली, गळ्यातली, बांगडय़ा, अँकलेट्स, अंगठया, ब्रेसलेट्स, स्कार्फ मिळतात.,

फुलकारी,लखनऊ,कॉटन,सिल्कचे लेटेस्ट फॅशनचे जीन्स टॉप्स,कुर्ते,स्कर्ट्सही विक्रिस आहेत. स्टाईलीश चपलापासून ते मेकअप साहित्य इथ उपलब्ध आहे. काही रूपयांपासून ते काही हजार रूपयाची खरेदी करणारे ग्राहक इथ येतात.ब्रिटिश कालीन जहाजातील दिशादर्शक होकायंत्रे,सी शिप कंपास, दुर्बिन्स पितळेच्या दुर्गा,गणेश,देवी देवतांच्या मूर्ती,मेटल बुद्धा मूर्ती विक्रिस आहेत.

कुलाबा कॉजवे हॉकर्स वेल्फेयर असोसिएशन अध्यक्ष सरदार अहमद शेख

कुलाबा कॉजवे मार्केट मध्ये महानगर पालिकेची नोंदणी असलेले एकूण 189 स्टॉल्स आहेत. मागील वर्षी केंद्र सरकारने 10 हजार कर्ज उपलब्ध केले होते ते कर्ज स्वरुपात त्यात्या बँकांकडून मिळाले आहे.आम्ही लॉक डाऊन साठी दुकाने बंद करीत सरकारला मदत करत आहोत.राज्य सरकार आम्हाला आता 1500 रुपये प्रति महिन्याला देणार तर आमचे घर कसे चालणार हा प्रश्न असला तरीही कोरोना लवकर जावा म्हणून राज्य सरकार प्रयत्न करीत आहे त्याला आमचा पाठींबा आहे.आमचे भविष्य सुरक्षित ठेवणे हे सरकार ची जबाबदारी आहे.

विजय शेट्टी (अध्यक्ष - फॅशन मार्केट व्यापारी असोसिएशन)

मेट्रो येथील फॅशन स्ट्रीट येथील 400 स्टॉल धारक तयार फैशनेबल कपड, आभूषण, पादत्राणे,परफ्यूम्स आणि मोबाईल संबंधित वस्तु विकतात. आम्ही सरकारच्या लॉक डाऊनच्या निर्णयाचे स्वागत करतो. करोनाची दुसरी जीवघेणी लाट रोखण्यासाठी आम्ही दुकाने बंद ठेवत राज्य सरकारला मदत करीत आहोत. आधी करोनाचे उच्चाटन मग सुरक्षित व्यवसाय. सरकारने आम्हाला वाऱ्यावर सोडू नये हिच विनंती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT