मुंबई

मुंबईकर अनुभवतायत माथेरानपेक्षा अधिकची थंडी

मिलिंद तांबे

मुंबई: मुंबईतील किमान तापमानात आणखी घट झाली आहे. काही भागांतील किमान तापमान माथेरानपेक्षा खाली गेल्याचे दिसते. गोरेगाव येथे सर्वाधिक कमी तापमानाची नोंद झाली असून येथे 14.90 अंश सेल्सियस तापमान नोंदवण्यात आले. माथेरान मधील किमान तापमान 18.6 इतके नोंदवण्यात आले.

मुंबईत अनेक विभागांत किमान तापमान 20 अंशाच्या खाली नोंदवण्यात आले. सांताक्रूझ 16.37 तर पवई येथे 17.60 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. वांद्रे 18, बीकेसी 18, मालाड 18, कांदिवली 19, कुलाबा 20.4 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.

 राज्यातील पारा 10 अंशाच्या खाली

राज्यातील अनेक भागात पारा घसरला असून किमान तापमान 10 अंशाच्या खाली नोंदवले गेले. त्यामुळे दिवसा घामाच्या धारा निघत असल्या तरी पहाटे थंडीचा जोर वाढल्याचे दिसते.

राज्यात सर्वाधिक कमी तापमानाची नोंद जळगाव येथे 7 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. त्या खालोखाल बारामती 8.8,पुणे 8.6, नाशिक 9.1 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. 

उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळून नदीला पूर आला. बर्फ मोठ्या प्रमाणात कोसळल्याने थंडीची लाट ही आली आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रात जाणवत असून अनेक भागात पारा खाली घसरला आहे.

राज्यात आज किमान तापमानाची नोंद झाली असून तापमान 'सिंगल डिजिट' वर आले आहे. अनेक भागांतील तापमान 10 अंशाच्या खाली नोंदवण्यात आले असून ही परिस्थिती पुढील 48 तास अशीच राहण्याचा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केला आहे.


जिल्हा   तापमान (तापमान अंश सेल्सियस मध्ये)
जळगाव- 7 
सातारा- 10.7 
नाशिक-  9.1 
बारामती-  8.8 
पुणे-  8.6
सांगली- 13.9 
जेऊर-  9 
मालेगाव-  10.4 
सांताक्रूझ-  17.6 
डहाणू-  17.1 
ठाणे-  20.2
औरंगाबाद- 10.7 
जालना- 14 
परभणी-  9.9 
उस्मानाबाद- 12.4 
नांदेड- 10.7 

--------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

mumbai coldest day minimum temperature dips dry climate

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Chief Minister : 'एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यास सुखाचे दिवस येतील'; महायुतीतील मंत्र्यांच्या वक्तव्याने राजकीय खळबळ

Nashik Honey Trap: मैत्रिणीसोबत लॉजवर गेला, हनी ट्रॅपमध्ये अडकवून ७ लाखांची खंडणी मागितली; दोघाना अटक

Mumbai Local: बंद दरवाजाची साधी लोकल लांबणीवर, मुंबईकरांच्या प्रतीक्षेत वाढ; सुरक्षा चाचणीत तांत्रिक अडथळे

Latest Marathi News Live Update : मनोज जरांगे यांच्या भेटीला अभिजीत दिपके, सरकारवर हल्लाबोल

Ganesh Chaturthi 2026: १४ सप्टेंबरला बाप्पाचे आगमन! जाणून घ्या अचूक तिथी ,प्राणप्रतिष्ठेचा शुभ मुहूर्त अन् संपूर्ण पूजा विधी....

SCROLL FOR NEXT