Mumbai  Sakal
मुंबई

Mumbai : भिवंडी सीरिया करण्याचा कट! तपासात धक्कादायक खुलासा

इसिस महाराष्ट्र टेरर मॉड्युल प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) अटक केलेल्या आरोपींची चौकशी सुरू...

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - सीरियातील पवित्र ‘साम-ए-पाक’ भूमीपर्यंत पोहोचू शकत नव्हतो. त्यामुळे भिवंडीसह परिसराचा सीरिया बनवण्याचा कट होता, असा खुलासा पडघा येथून अटक केलेल्या झुल्फिकार अली बडोदावालाच्या चौकशीत समोर आला आहे.

इसिस महाराष्ट्र टेरर मॉड्युल प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) अटक केलेल्या आरोपींची चौकशी सुरू आहे. या चौकशीत धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.

बडोदावाला इसिस महाराष्ट्र मॉड्युलचा सूत्रधार आहे. तो मुंबईतील सात रस्ता भागातील रहिवासी असून सहा महिन्यांपूर्वी त्याने पडघा येथे स्थलांतर केले. बडोदावाला वाणिज्य शाखेचा पदवीधारक असून तो गेल्या १६ वर्षांपासून अंधेरीतील आयटी कंपनीत कार्यरत आहे.

एनआयएने अटक करण्यापूर्वी तो नियमित अंधेरी ते पडघा ये-जा करत होता. मेहुणा डॉ. अदनान अली याच्या विचाराने प्रभावित होऊन त्याने सहा महिन्यांपूर्वी पडघा येथे स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला.

पडघ्यातून आणखी एक अटकेत

पुणे शहरात दहशतवादी कारवाया करण्याच्या कटात सहभागी असल्याप्रकरणी एनआयएने आणखी एकाला आज अटक केली.

शमील नाचन (पडघा, ता. भिवंडी) असे त्याचे नाव आहे. बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण आणि स्फोट घडवून आणण्यासाठी घेतलेल्या चाचणीत त्याचा सहभाग आढळून आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT