Cement road 
मुंबई

Mumbai : सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांवर खड्डे पडल्यास कंत्राटदार जबाबदार; पी. वेलरासू यांची माहिती

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - मुंबई खड्डे मुक्त व्हावी यासाठी सिमेंट कॉंक्रीटचे ४०० किलोमीटरचे रस्ते करण्याचे कामे हाती घेण्यात येणार आहे. एकूण ९१२ रस्ते सिमेंट क्रॉंक्रीटचे होणार असून सद्या ८६ रस्त्यांची कामे सुरु असून ३९ सिमेंट क्रॉंक्रीटचे रस्ते कामे पूर्ण झाली आहेत. तर उर्वरित सिमेंट क्रॉंक्रीटचे रस्ते कामे पावसाळ्यानंतर सुरु होतील, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी वेलरासू यांनी दिली.

सिमेंट कॉंक्रीटच्या रस्त्यांची जबाबदारी तीन वर्षांसाठी ५ कंत्राटदारांची असून तीन वर्षांत खड्डे पडल्यास कंत्राटदार जबाबदार असेल, असा इशारा पी वेलरासू यांनी दिला.

मुंबईतील ४०० किलोमीटरचे रस्ते सिमेंट क्रॉंक्रीटचे करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंग चहल यांना दिले होते. चहल यांनी पुढील दोन वर्षांत मुंबईतील रस्ते खड्डे मुक्त होतील आणि संपूर्ण रस्ते सिमेंट काँक्रिटचे असतील, अशी ग्वाही दिली आहे. मुंबईत सिमेंट काँक्रिटचे रस्ते करण्यासाठी पाच कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात आली आहे.

एकूण ९१२ रस्ते कामे होणार असून आतापर्यंत ३९ काम पूर्ण झाले आहे. मात्र पावसाळ्यात सिमेंट क्रॉंक्रीटचे रस्त्याचे काम करणे शक्य नसल्याने ऑक्टोबरपासून पुन्हा सिमेंट क्रॉंक्रीटचे रस्ते करण्यास सुरुवात होईल, असेही वेलरासू यांनी सांगितले.

पावसाळ्यात सीसी रोडची कामे ठप्प

मुंबईत एकूण ४०० किलोमीटरचे रस्ते सिमेंट क्रॉंक्रीटचे होणार आहेत. यासाठी पाच कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र मुंबई शहरात अद्याप सिमेंट क्रॉक्रीटचे रस्ते कामास सुरुवात झाली नसल्याचे ते म्हणाले.

जबाबदारी कंत्राटदाराची

सिमेंट क्रॉंक्रीटचे रस्ते काम पूर्ण झाल्यानंतर त्या रस्त्यांची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी संबंधित कंत्राटदाराची असणार आहे, असेही ते म्हणाले. १० वर्षे हमी कालावधीत जबाबदारी कंत्राटदारांची असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Iran war : युद्ध पुन्हा भडकले ! शस्त्रसंधी सुरु असतानाच अमेरिकेचा हल्ला, इराणचाही प्रतिहल्ला; कुवेत ठरलं रणांगण

Viral Video: RCB च्या विजयानंतर विराट-अनुष्काचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून चाहते झाले वेडे!

ओबीसी आरक्षणावर गदा, ग्रामपंचायतीच्या रणधुमाळीआधी राज्य निवडणूक आयोगाचे नवे आदेश

Accident News: मराठा आंदोलनातून परतताना काळाचा घाला; सरडेवाडीतील एकाचा मृत्यू, दोघे जखमी

Latest Marathi News Update : 'शिवाजी कोण होता?' पुस्तकाच्या बनावट प्रति बाजारात

SCROLL FOR NEXT