mangalprabhat lodha sakal
मुंबई

Mumbai News : पालक मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या पालिका मुख्यालयातील दालनाचा वाद चिघळला

इतर पक्षांची कार्यालये सील केली असताना माजी भाजपाचे नगरसेवक पालकमंत्र्यांच्या दालनात बसू लागल्याने नव्या वादावा तोंड फुटले आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - उपनगर जिल्ह्याचे पालक मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या पालिका मुख्यालयातील दालनात सद्या भाजपा नगरसेवकांची वर्दळ वाढू लागली आहे. इतर पक्षांची कार्यालये सील केली असताना माजी भाजपाचे नगरसेवक पालकमंत्र्यांच्या दालनात बसू लागल्याने नव्या वादावा तोंड फुटले आहे. हा वाद चिघळण्याची शक्यता आहे.

मंत्री लोढा यांनी गेल्या शुक्रवारी पालिका मुख्यालयातील दालनाचे उद्घाटन केले. पालिकेतील राजकीय पक्षांची कार्यालये सील केली आहे. त्यानंतर माजी नगरसेवक कार्यालयाबाहेर ठेवलेल्या बाकांवर बसू लागले. तेथे गर्दी वाढल्याने ती बाकेही काढण्यात आली. त्यामुळे माजी नगरसेवक पालिकेत येणे बंद झाले आहे.

प्रशासकीय काही काम असेल तर संबंधित अधिका-यांकडे जावून काम करून नगरसेवक मोकऴे होतात. माजी नगरसेवक पालिका मुख्यालयात थांबत नव्हते.

पालिका मुख्यालयात आता थेट मंत्री लोढा यांनीच कार्यालयात थाटले आहे. त्यामुळे भाजपाच्या नगरसेवकांना आयतेच दालन उपलब्ध झाले आहे. भाजपाचे माजी नगरसेवक मंत्री लोढा यांच्या कार्यालयात बसू लागले आहेत. नगरसेवक आळीपाळीने बसू लागले आहेत. त्यामुळे दालनाच्या वाद चिघण्याची दाट शक्यता आहे.

आज भाजपाचे माजी गटनेते प्रभाकर शिंदे हे माजी नगरसेवकांसोबत कार्यालयात होते. त्यांना याबाबत विचारले असता, ते म्हणाले की, हे उपनगराच्या पालक मंत्र्यांचे कार्यालय आहे. येथे मुंबईतील नागरिक आपली गा-हाणी घेवून येत आहे. जनतेच्या प्रश्नाच्या सोडवणूकीसाठी हे दालन आहे. येथे कोणीही येवू शकते.

नागरिकांच्या तक्रारी

काही नागरिक आणि संस्थांचे कार्यकर्ते आपले प्रश्न घेवून आले होते. काल नागरिकांच्या सुमारे 40 तक्रारी आल्या होत्या. काहीना पालक मंत्र्याचे फॉर्वडिंग लेटर दिले. काही नागरिकांना आयुक्तांची भेट घडवून दिली. काही फेरीवाले आले होते. परवाना असूनही कारवाई केली जात आहे अशा फेरीवाल्यांच्या तक्रारी होत्या.

चिराबाजार विभागात वीजेच्या लपंडाल गेल्या काही दिवसापासून सुरू आहे. अशी बेस्टशी संबिधित तक्रार होती. सफाई कामगारांच्या वसाहतींच्या पूनर्विकासाचा प्रश्न घेवून नागरिक आले होते, अशी माहिती भाजपाचे माजी गटनेते प्रभाकर शिंदे यांनी दिली.

दालनाचा वाद चिघळणार

पालक मंत्र्याचे दालन उघडे झाल्यामुळे भाजपाचे माजी नगरसेवक आता खुलेआम बसू लागले आहे. इतर पक्षाच्या नगरसेवकांना बंदी आहे. पालिकेतील सर्वात असलेला शिवसेनेत (ठाकरे गट) यामुळे संतापाची भावना आहे. त्यामुळे दालनाचा विषय चिघळण्याची शक्यता आहे.

कार्यालय भाजपाने बळकावले

पालिकेतील कार्यालय मंत्र्यांनी बऴकावले आहे. तेथे जनतेची कामे होणार नाही. तर भाजपाचे कार्यालय म्हणूनच ते वापरले जात आहे, हे खपवून घेतले जाणार नाही, अशी प्रतिक्रिया माजी महापौर किशोऱी पेडणेकर यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW, World Cup: भारताचा सलग दुसरा पराभव! एलिसा हेलीच्या ऑस्ट्रेलियाने सर्वात मोठे लक्ष्य पार करत घडवला इतिहास

Mumbai: एसटी संघटनांमध्ये कुरघोडीचे राजकारण! आंदोलनाचे श्रेय घेण्यावरून चढाओढ, उपमुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत तोडगा सुटणार

Water Taxi: मुंबईतील वॉटर टॅक्सीचे काम कधी पूर्ण होणार? मोठी अपडेट आली समोर, वाचा सविस्तर...

INDW vs AUSW: एलिस पेरी आऊट न होताच गेली मैदानाबाहेर, पण भारताविरुद्ध कर्णधार एलिसा हेलीचं शतक

Kolhapur : आमदाराला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याच्या प्रकरणात मोठी अपडेट, बहीण-भावानेच केलेलं कांड; मैत्री करत...

SCROLL FOR NEXT