corona mask
corona mask sakal media
मुंबई

'हीच वेळ डबल मास्क ढालीची'; कोरोना टास्क फोर्सचं आवाहन

भाग्यश्री भुवड

मुंबई : मुंबईतील (Mumbai) कोरोना रूग्णसंख्या (corona patient) घटत आहे. मात्र, जेव्हा कोरोना रूग्ण जास्त संख्येने आढळत होते तेव्हाही मुंबईकर मास्क वापरताना (mask) दिसत नव्हते. संभाव्‍य तिसरी लाट आणि सध्या टप्प्याटप्प्याने सुरु असणाऱ्या निर्बंध शिथिलतेदरम्यान (lockdown) डेल्टा सारख्या विषाणूचा संसर्ग होण्याची (delta plus variant) सर्वाधिक भीती आहे. त्यामुळे राज्य कोरोना टास्क फोर्स मधील तज्ज्ञही सुचवीत आहेत की, 'हीच वेळ डबल मास्क वापरण्याची आहे'. (Mumbai-corona patient-mask-delta plus variant-lockdown-corona task force-nss91)

पहिली लाट सरताना आणि दुसरी लाट सुरु होतानाच्या कालावधीत बहुतांश जण कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर म्हणजेच कोविड प्रतिबंधात्मक वागणूक विसरले होते. नेमक्या त्याच काळात कोविड संसर्ग बळावला असल्याचे तज्ज्ञ सांगतात. त्या स्थितीची पुनरावृत्ती होऊ नये या साठी आता तरी सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याचे आवाहन तज्ज्ञ करत आहेत. दरम्यान सध्या स्थिती अधिक बिकट झाली असून डेल्टा सारख्या भयंकर विषाणूचा संसर्ग होण्याची भीती आहे. त्यामुळे सिंगल मास्क न वापरता डबल मास्क वापरण्यास प्राधान्य द्या असे आवाहन राज्य टास्क फोर्सकडून केले जात आहे.

डबल मास्क वापरण्याच्या विषयावर बोलताना राज्य कोरोना टास्क फोर्सचे डॉ. अविनाश सुपे म्हणाले की, डेल्टा व्हेरियंट आणि डेल्टा या विषाणु प्रतिबंधासाठी डबल मास्क वापरावा असे जागतिक पातळीवरच गेल्या वर्षी पासून सुचवले जात आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. जे दुर्देवी आहे. यात कापडी मास्क आणि तीन लेयरचा मास्क वापरावा. त्यात एन95 असल्यास अधिक चांगले आहे. आरोग्य कर्मीनी तीन लेयर आणि एन95 मास्क वापरावा. हे मास्क विषाणूला प्रतिबंध करणाऱ्या थराचे असावेत. शिवाय, हे मास्क व्यवस्थित नाक तोंड झाकणारे असावेत. यातून 95 टक्के सुरक्षा मिळू शकते. कोविड विषाणू सतत बदलत्या रूपात येत आहे. तो जसे आपले रूप बदलतो तशी आपण आपली सुरक्षा साधने देखील बदलावीत. ती अधिक मजबुतीने सुरक्षित करावीत. त्यासाठी डबल मास्क सुचविण्यात येत असल्याचे डॉ. सुपे म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahadev Betting App: महादेव बेटींग अ‍ॅप प्रकरणी आणखी एका अभिनेत्याला अटक

Antarctica Penguin : ग्लोबल वॉर्मिंगमुळे नष्ट होतायत अंटार्क्टिकावरील पेंग्विन; बर्फ वितळल्यामुळे लाखो नवजात पेंग्विन्सचा मृत्यू

Iraq: इराकमध्ये समलैंगिक संबंधाना गुन्हा ठरवणारा कायदा मंजूर; तब्बल इतक्या वर्षांचा होणार तुरुंगवास

Bhandup Cash: पैशाने भरलेली व्हॅन जप्त, निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाची कारवाई

Yoga Tips : मानसिक आरोग्यासाठी अन् शारिरीक तंदूरूस्तीसाठी फायदेशीर आहेत 'ही' योगासने, दररोज करा सराव

SCROLL FOR NEXT