Coronavirus Sakal
मुंबई

मुंबई कोरोना अपडेट; पॉझिटिव्हीटी रेट 17 दिवसांत 36 टक्क्यांनी घटला

गुरुवारी मुंबईचा पॉझिटिव्हीटीचा दर 2.27 टक्के होता. त्यानुसार मुंबईच्या पॉझिटिव्हीटीचे प्रमाण अवघ्या 17 दिवसात 36 टक्क्यांनी कमी झाले आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - मुंबईत (Mumbai) कोरोना विषाणूची (Coronavirus) साखळी तोडण्यासाठी लोकांना जागरूक करण्याबरोबरच निष्काळजीपणा करणार्‍यांना शिक्षाही (Punish) केली जात आहे. याचाच परिणाम म्हणून मुंबईत कोरोनाच्या नवीन रुग्णांची (Patient) संख्या कमी होत असल्याने पॉझिटिव्हीटीचे (Positivity) प्रमाणही दिवसेंदिवस कमी होत आहे. (Mumbai Corona Positivity Rate Decrease)

गुरुवारी मुंबईचा पॉझिटिव्हीटीचा दर 2.27 टक्के होता. त्यानुसार मुंबईच्या पॉझिटिव्हीटीचे प्रमाण अवघ्या 17 दिवसात 36 टक्क्यांनी कमी झाले आहे. गुरुवारी मुंबईत कोरोनाचे 666 रुग्ण आढळले होते आणि 20 रुग्णांचा मृत्यू झाला. दरम्यान, कोरोना चाचणीच्या पॉझिटिव्हिटी रेटचा आलेख देखील कमी होत आहे.

1 जून रोजी मुंबईतील पॉझिटिव्हीचे प्रमाण 3.53 टक्के होते, जो 17 दिवसांत 36 टक्क्यांनी खाली आला आहे. 17 जून रोजी पॉझिटिव्हीटीचा दर 2.27 टक्क्यांवर आला. ‘ब्रेक द चेन' अभियानाचा हा परिणाम असल्याचे पालिकेचे कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले.

मुंबईत दररोज सरासरी 30 हजार लोकांची तपासणी केली जाते. यानंतर, त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना शोधून काढले जाते आणि त्यांच्यावरही वेळीच उपचार केले जात आहेत. त्वरित उपचार आणि पाॅझिटिव्ह रूग्णांशी त्वरित संपर्क साधून व्हायरसचा प्रसार थांबवला जात आहे. पॉझिटिव्हीटीचा दर कमी होणे ही एक सकारात्मक बाब असल्याचे ही डॉ. गोमारे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT