मुंबई

मुंबईतील संक्रमण नियंत्रणात! 19 प्रभागांमध्ये रुग्णवाढीचा दर झाला 'इतका' कमी

समीर सुर्वे : सकाळ वृत्तसेवा


मुंबई : शहरातील कोव्हिड संक्रमण हळूहळू नियंत्रणात येत असल्याचे दिसत आहे. मुंबईतील 24 पैकी 19 प्रभागांमध्ये रुग्णवाढीचा दर दिड टक्क्यांहून  कमी आहे. तर, उरलेल्या पाच प्रभागांमध्ये संक्रमणाचे प्रमाण कमी होत आहे. मुंबईचा रुग्णवाढीचा दरही 1.26 टक्क्यांवरुन 1.21 टक्क्यांवर आला आहे. तर 9 प्रभागातील रुग्णवाढीचा दर 1 टक्क्यांहून कमी असून 4 प्रभागातील दर 1.2 टक्क्यांपेक्षा कमी आहे.

मुंबईतील 19 जूलैच्या नोंदीनुसार आर मध्य बोरीवली प्रभागातील कोव्हिड वाढीचा दर सर्वाधिक 2.4 टक्के नोंदविण्यात आला आहे. त्या खालोखाल कांदिवली आर उत्तरमध्ये  1.8 टक्के,  डी ग्रन्टरोड, मलबार हिलमध्ये 1.7, टि मुलूंडमध्ये 1.7, आर उत्तर दहिसरमध्ये 1.6 आणि कुलाबा ए प्रभागात 1.4 टक्के वाढीचा दर आहे. ए प्रभाग हा मुंबईतील सर्वात सुरक्षित प्रभाग होता. मात्र, गेल्या तीन दिवसांत या भागातील संक्रमण अचानक वाढले होते. 18 जूलैला या प्रभागात रुग्णवाढीचा दर 1.7 टक्के होता. त्याच बरोबर आर मध्य येथे 2.5 टक्के, डि प्रभागात 1.9, आर दक्षिण येथे 1.9, टि प्रभागात 1.9, आर उत्तर येथे 1.7 टक्के रुग्णवाढीचा दर 18 जूलै रोजी नोंदवला होता.


हॉटस्पॉट मधील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी (दिवसात)

प्रभाग 18 जूलै 19 जूलै एकूण रुग्ण 19 जूलै 
आर मध्य 28 29 4509
आर दक्षिण 37 38 4311
डी 37 42 3648
टि 38 42 4158
आर उत्तर 40 43 2455
42 49 2313

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women T20 World Cup: महिला टी-२० विश्वचषक २०२८ साठी ९ संघ पात्र! पाकिस्तानलाही मिळाले तिकीट; आता उरले फक्त 'इतके' स्पॉट्स

Thane News: नवी मुंबई ते कल्याण प्रवास आणखी वेगवान होणार! ऐरोली-कटाई उन्नत रस्ता प्रकल्पाचा टप्पा कधी खुले होणार? जाणून घ्या...

Union Minister: वारे मंत्री महोदय! स्वतःच्याच खात्याची सबसिडी उचलली; पंतप्रधान मोदी अ‍ॅक्शन घेणार का?

Navi Mumbai: सहा कोटींचा भार! वेतनवाढीचा पालिकेच्या तिजोरीवर आर्थिक ताण

IND vs IRE: आयर्लंडविरुद्धच्या करो या मरो सामन्यात 'हे' ३ खेळाडू ठरणार श्रेयस अय्यरचे हुकमी एक्के; मालिका वाचवण्यासाठी खास रणनीती!

SCROLL FOR NEXT