मुंबई

आज मुंबईत 643 नवे रूग्ण, तर 12 रूग्णांचा मृत्यू

मिलिंद तांबे

मुंबई, ता. 24 : मुंबईत आज 643 नवे रुग्ण सापडले असून एकूण रुग्णसंख्या 2,89,204 झाली आहे. तर आज 12 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 11,045 वर पोचला आहे. आज 711 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 2,69,294 रूग्ण बरे होऊन घरी गेले. रुग्ण बरे होण्याचा दर हा 93 टक्के इतका झाला आहे. मुंबईत रुग्ण दुपटीचा दर 366 दिवसांवर गेला आहे. तर 23 डिसेंबरपर्यंत एकूण 22,65,635 कोविड चाचण्या करण्यात आल्या. तर 17 डिसेंबर ते 23 डिसेंबर दरम्यान कोविड रुग्णवाढीचा दर 0.21 इतका आहे. 

मुंबईत आज मृत झालेल्या 14 पैकी 11 जणांना दीर्घकालीन आजार होते. आजच्या एकूण मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये 10  पुरुष व 2 महिलेचा समावेश आहे. मृत झालेल्यांपैकी एकाचे वय 40 वर्षा खालील होते. 6 जणांचे वय 40 ते 60 वर्षा दरम्यान होते तर 5 रुग्णांचे वय 60 वर्षांवर होते. 

मुंबईत 293 इमारती आणि झोपडपट्टया कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले असून सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 2,739 इतकी आहे. बाधित रूग्णांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत असून गेल्या 24 तासात बाधित रुग्णांच्या संपर्कात 3,220 अति जोखमीचे व्यक्ती आले आहेत. त्यामुळे कोविड काळजी केंद्रात दाखल करण्यात येणाऱ्यांची संख्या देखील वाढत असून आज कोविड काळजी केंद्र 1 मध्ये 423 अति जोखमीचे संपर्क उपचारासाठी दाखल करण्यात आले. 

mumbai corona update on Christmas eve 643 new patients detected in mumbai

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, १४ जिल्ह्यांत जोरदार बरसणार; ४८ तास धोक्याचे

Latest Marathi News Updates: आयुष कोमकर हत्या प्रकरणी आंदेकर कुटुंबातील आणखी चौघांना अटक

Pune Theatre Festival : नाट्यप्रेमींसाठी तीन दर्जेदार नाटकांची पर्वणी; ‘सकाळ’तर्फे येत्या आठवड्यात नाट्य महोत्सवाचे आयोजन

Gondia News: देवरी एमआयडीसीतील सुफलाम कंपनीत भीषण अपघात; मशीनमध्ये अडकून मजुराचा होरपळून मृत्यू

TET Exam Date : टीईटी परीक्षेची तारीख ठरली, परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज व परीक्षा शुल्क 'या' तारखेपासून भरता येणार

SCROLL FOR NEXT