corona patient sakal media
मुंबई

मुंबईत दैनंदिन रुग्णवाढीमुळे सक्रिय रुग्णांमध्ये वाढ; वाचा सविस्तर

गंभीर रुग्णांची संख्या मात्र 141 पर्यंत खाली

मिलिंद तांबे

मुंबई : गेल्या आठवड्याभरापासून मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णासंख्येत (Mumbai corona patients) काहीशी वाढ होत आहे. दीडशे पर्यंत खाली गेलेली रुग्णसंख्या वाढत असून (corona patients increases) रविवारी 336 रुग्ण आढळले. परिणामी सक्रिय रुग्णांमध्ये (corona active patients) देखील भर पडली असून त्यात वाढ होऊन 2018 वर पोहोचला आहे. असे असले तरी गंभीर रुग्णांची संख्या मात्र 141 वर नियंत्रणात आहे.

मुंबईत शनिवारी 1948 सक्रीय रुग्ण होते. रविवारी त्यात 2018 पर्यंत वाढ झाली. दैनंदिन बाधित रुग्णसंख्या वाढल्याने सक्रिय रूग्णांमध्ये देखील वाढ झाली आहे. गेल्या आठवड्याभरात 1431 कोविडबाधित रुग्णांची भर पडली आहे. परिणामी सक्रिय रुग्णांची संख्या देखील 312 ने वाढली आहे.

गंभीर रुग्णांची संख्या सध्या नियंत्रणात आहे. बाधित रुग्ण वाढत असले तरी गंभीर रुग्ण वाढलेले नाहीत. सध्या विविध रुग्णालयात केवळ 141 गंभीर रुग्ण उपचार घेत आहेत. उपचाराधीन एकूण दाखल रुग्णांपैकी केवळ 736 रुग्णांना लक्षणे जाणवत आहेत तर 1071 रुग्ण लक्षणे विरहित आहेत.

"कोरोना संसर्ग पूर्णतः नियंत्रणात आहे. होणारी रुग्णवाढ नगण्य आहे. ओमायक्रॉन संसर्गाची प्रकरणे ही कमी असून पालिका रुग्णालये सज्ज आहेत. काही लक्षणे जाणवत असल्यास अंगावर न काढता तात्काळ तपासणी करून घ्या."

- डॉ.रमेश भारमल , संचालक , पालिका मुख्य रुग्णालये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

Mumbai Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गाची दुरावस्था, शरद पवार गटाचा संताप; उच्च न्यायालयात धाव

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

SCROLL FOR NEXT