Corona Death sakal media
मुंबई

मुंबई : कोविडमुळे सर्वाधिक ज्येष्ठांचा मृत्यू

भाग्यश्री भुवड

मुंबई : कोविड 19 या महामारीचा (corona pandemic) संसर्ग अनेकांना झाला, त्यातून ज्यांना तीव्र संसर्ग झाला त्यांचा मृत्यू (corona deaths) ओढावला.  मुंबईत 10 ऑक्टोबरपर्यंत 16,149 मृत्यू पालिकेकडून (bmc report) नोंदवण्यात आले. या एकूण मृत्यूपैकी सर्वाधिक म्हणजे 27.4% टक्के मृत्यू 61 ते 70 वयोगटातील तर 71 ते 80 वयोगटात 23.6% मृत्यू नोंदवले. या दोन्ही वयोगटातील मिळून शहरातील मृत्यूंमध्ये 51% कोविड मृत्यू ज्येष्ठ नागरिकांचेच झाले (senior citizen) असल्याचे आकडेवारी वरून समोर येत आहे. त्यामुळे, पहिल्या लाटेत, दुसऱ्या लाटेत शिवाय, संभाव्य तिसऱ्या लाटेतही (corona third wave) ज्येष्ठांनाच कोरोनाचा सर्वाधिक त्रास होणार असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात. 

दरम्यान, कोविड महामारी सुरू झाल्यापासून आता पर्यंत 61 ते 80  वयोगटातील 51 टक्के मृत्यू झाले असून त्याची कारण मीमांसा तज्ज्ञ आता स्पष्ट करत आहेत. राज्याच्या कोविड -19 टास्क फोर्सचे सदस्य डॉ. राहुल पंडित यांनी सांगितलं की, वाढते वय आणि कॉमोरबीड स्थितीत ज्येष्ठ नागरिकच रडारवर राहिले. ही दोन कारणे त्यांच्या मृत्यूच्या प्रमुख कारणात आहे.

या वयोगटातील बहुतेक मृतांना मधुमेह आणि उच्च रक्तदाब असल्याचे सांगण्यात आले. यामुळे त्यांच्यात कोविड 19 ची गंभीर लक्षणे निर्माण दिसली. त्यानंतर त्यांची आरोग्य स्थिती पूर्वस्थितीत येणे कठीण झाले होते. शिवाय आता पर्यंत 13.3% मृत्यू 80 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये पाहिले गेले, तर सुमारे 37% मृत्यू 20-60 वर्षांच्या लोकांमध्ये नोंदवले गेले. डॉ. पंडित यांच्या म्हणण्या नुसार कोविड पूर्णतः गेला नसून छुपा संसर्ग अजूनही आहे. यात लसीकरण ठराविक प्रमाणात संरक्षण देत असून कोविड वर्तणूक महत्वाची आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident News: राजगडाच्या वाटेवर दुर्दैवी दुर्घटना; पाबे घाटात मिनी बस दरीत कोसळली, दोन जणांचा मृत्यू...

Latest Marathi News Update : श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचा आज वाशीम जिल्ह्यात दुसरा दिवस

IND vs IRE, IND W vs AUS W: आज क्रिकेट चाहत्यांची चांगलच गोंधळणार! टीम इंडियाचे एकाच दिवशी 2 सामने; कुठे आणि किती वाजता पाहणार?

Kolhapur Crime: काेल्हापुरातील पाडळकर मार्केटसमोरील व्हिडिओ पार्लरवर छापा; माजी नगरसेवकावर गुन्हा, साडेचार लाखांची एकवीस मशीन ताब्यात

TET 2026 Paper Leak : त्यांच्याकडे आमदार-खासदार फोडण्याचे कौशल्य; टीईटी पेपरफुटी प्रकरणानंतर अभिजित दीपकेंची सरकारवर टीका

SCROLL FOR NEXT