corona update sakal media
मुंबई

मुंबईत दिवसभरात कोरोनाच्या 394 नव्या रुग्णांची भर; 6 जणांचा मृत्यू

मिलिंद तांबे

मुंबई : मुंबईत (Mumbai) आज दिवसभरात कोरोनाच्या 394 नवीन रुग्णांची (corona new patients) नोंद झाली. सोमवारी 377 बाधित रुग्ण सापडले होते. कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 7,42,011वर पोहोचली आहे. तर 477 रुग्णांनी कोरोनावर मात (corona free patients) केल्याने आतापर्यंत 7,18,813 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

आज 6 कोविड मृत्यूची नोंद झाली झाली. मृतांचा एकूण आकडा 16,097 वर पोचला आहे.बरे झालेल्या रूग्णांचा दर 97 टक्के असून कोविड वाढीचा दर 0.06 टक्के आहे.मुंबईतील रूग्ण दुपटीचा कालावधी वाढून 1200 दिवस झाला.आज दिवसभरात 28,838 कोविड चाचण्या झाल्या असून आतापर्यंत 1,02,76,502 एवढ्या चाचण्या झाल्या आहेत. मुंबईत सध्या 4611 सक्रिय रुग्ण आहेत. 

धारावीमध्ये शून्य रुग्णांची नोंद

आज धारावी मध्ये पुन्हा एकदा शून्य रुग्णांची नोंद झाली. धारावीमध्ये तब्बल वीस वेळा शून्य रुग्ण नोंद झाली आहे. धारावीतील एकूण रुग्णसंख्या 7088 इतकी आहे. आज दादर मध्ये 4 रुग्णांची नोंद झाली असून एकूण रुग्णसंख्या 10,162 झाली आहे. तर माहीम मध्ये आज 1 रुग्ण सापडला असून एकूण रुग्णसंख्या 10,534 वर पोहोचली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बावनकुळेंपासून वडेट्टीवारांपर्यंत! नागपूर पदवीधरसाठी १४ आमदारांसह दोन खासदारांना मतदानच करता येणार नाही, धक्कदायक कारण समोर...

आजारी पडल्यावर सोनाली बेंद्रे खाते सीकेपी पद्धतीचा हा खास पदार्थ; शुटिंगमुळे दमल्यावर हॉटेलवाल्यांनाही लावते कामाला

Teachers Mobile Ban: गुरूजींनी मोबाईलला म्हटले ‘बाय बाय’! सकाळी १० ते ४ फोन मुख्याध्यापकांकडे; अहिल्यानगरचा प्रयोग चर्चेत, रिल्स आणि गॉसिपला ब्रेक

भुवनेश्वर कुमारची टीम इंडियात वापसी कशी झाली? Ajit Agarkar च्या जाण्याने खुला झाला मार्ग, कोणी भाकरी फिरवली?

Repo Rate Hike: 44 महिन्यांनंतर RBIचा मोठा निर्णय! रेपो रेट वाढला; कर्ज आणि EMI किती महागणार? FD करणाऱ्यांना काय फायदा?

SCROLL FOR NEXT