Corona Hospital Bed sakal media
मुंबई

ओमिक्रॉन बधितांसाठी हजार बेड्स आरक्षित; मुख्य रुग्णालयांसह जम्बो सेंटर सज्ज

मिलिंद तांबे

मुंबई : एकाच दिवशी 7 ओमिक्रॉन बाधितांची (Mumbai Omicron patients) नोंद झाल्याने मुंबईतील चिंता वाढली आहे. ओमिक्रॉन बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यांच्यासाठी वेगळ्या रुग्णखाटा आरक्षित (Beds reserved) ठेवण्यात येत आहेत. मुख्य रुग्णालये (hospitals), वैद्यकीय महाविद्यालय (Medical college) आणि जम्बो कोविड सेंटर (corona center) मध्ये पहिल्या टप्प्यात 1 हजार रुग्णखाटा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.

मुंबईतील ओमिक्रॉन बाधित रुग्णांची संख्या 12 वर पोहोचली आहे. कस्तुरबा आणि राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था कडे पाठवण्यात आलेल्या आणखी नामुन्यांचा अहवाल येणे बाकी आहे. त्यातील काही नमुने ओमिक्रॉन बाधित येण्याची शक्यता नाकारता येत नाही. ओमिक्रॉनबाधित रुग्ण वाढण्याची शक्यता असल्याने त्यासाठी वेगळ्या रुग्णखाटा सज्ज ठेवण्यात येत आहेत असे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी म्हणाले.

महापालिकेच्या मुख्य रुग्णालयात ओमिक्रॉन रुग्णांसाठी वेगळ्या 10 रुग्णखाटा ठेवण्यात आल्या आहेत. त्याशिवाय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 40 रुग्णखाटांची व्यवस्था करण्यात आली आहे अशी माहिती पालिका मुख्य रुग्णालयांचे संचालक डॉ.रमेश भारमल यांनी दिली. तसेच शहरात जे कोविड काळजी केंद्र आहेत ते पुन्हा सुरू करण्यात येत असून पहिल्या टप्प्यात साधारणता 1 हजाराहून अधिक रुग्णखाटा सज्ज ठेवण्यात येत असल्याचे ही भारमल यांनी सांगितले.

"ओमिक्रॉनसह कोविड संसर्ग नियंत्रणात आहे. ओमायक्रॉन रुग्णांसाठी वेगळी व्यवस्था केली आहे. ओमायक्रॉन रुग्ण कोविड बधितांच्या संपर्कात येऊ नयेत यासाठी ही काळजी घेण्यात येत आहे."

-सुरेश काकाणी , अतिरिक्त आयुक्त , मुंबई महानगरपालिका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईत कोट्यवधींचं घर विकलं अन् घेतली बाईक! कारण काय? स्टार्टअप फाउंडरने सांगितली धक्कादायक निर्णयामागची कहाणी

WTC 2025-27: भारतीय संघाचं गणित बिघडलं! श्रीलंकेविरुद्धच्या 'ड्रॉ'नंतर Points Table मध्ये टीम इंडिया कोणत्या स्थानावर

शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करा, संयुक्त जमीन मोजणीला गती द्या; शक्तिपीठ महामार्गाबाबत आवाहन

Marathi News Live Updates : पुण्यातील नऱ्हेतील भूमकर चौक ते श्री कंट्रोल चौकदरम्यान १२ हजार ४०० चौरस फुटांवरील अतिक्रमणे हटविली

Encroachment : नऱ्हेतील भूमकर चौक ते श्री कंट्रोल चौकदरम्यान १२ हजार ४०० चौरस फुटांवरील अतिक्रमणे हटविली

SCROLL FOR NEXT