मुंबई

मुंबईकरांसाठी थोडं टेन्शन वाढवणारी बातमी!

काय आहे ही बातमी?

भाग्यश्री भुवड

मुंबई : मुंबईमध्ये पुन्हा एकदा लशींचा (vaccination) तुडवटा निर्माण झाला आहे. सध्या मुंबईत केवळ १५ ते २० हजार डोस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे आज बऱ्याच ठिकाणी लसीकरण केंद्रांवर डोस दिले जाणार नाहीत. फक्त जे विद्यार्थी शिक्षणासाठी परदेशात जाणार आहेत त्याच विद्यार्थ्यांचं वॉक-इन लसीकरण केलं जाणार आहे. त्यानुसार, कूपर, राजावाडी आणि कस्तुरबा रुग्णालयात या विद्यार्थ्यांचे लसीकरण केले जाईल. (mumbai-corona-vaccination-shortage-of-vaccines)

लसींचा पुन्हा तुटवडा भासू लागल्याने फक्त मोजक्याच लसीकरण केंद्रांवर आज लस दिली जाणार आहे. मुंबईत लसच उपलब्ध नसल्याची कबुली पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे, फक्त 52 केंद्रांवर सकाळी १- ते ३ या वेळात लसीकरण केले जाईल.

केवळ १५ ते २० हजार डोस शिल्लक?

मुंबईत सद्यस्थितीत फक्त 15 ते 20 हजार डोस शिल्लक असतील. पण, त्यांचे ही वितरण केले गेले आहे. किमान एक सेशन सुरू करण्यासाठी 10 वायल्स लागतात. ज्यांच्याकडे फक्त 3 ते 4 वायल्स असतील ती केंद्र लसीकरण नाही करु शकणार. त्यामुळे, पालिकेच्या खूप कमी केंद्रांवर लसीकरण केले जाईल, असं पालिका आरोग्य विभागाच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगल गोमारे यांनी सांगितलं.

परदेशी जाणाऱ्यांसाठी 300 डोस -

परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे लसीकरण केले जाणार असून यासाठी 300 डोसची सोय केली गेली आहे. राजावाडीत सकाळपासूनच लसीकरणासाठी या विद्यार्थ्यांची गर्दी झाली आहे. तर, कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस ही देण्यात येणार आहे. त्याचे 80 ते 100 डोस राजावाडी रुग्णालयात आहेत. किमान 300 विद्यार्थ्यांचे लसीकरण केले जाईल. हेल्थकेअर वर्कर्स आणि फ्रंटलाइन वर्कर्स यांना ही आज दुसरा डोस दिला जाईल, असं रजावाडी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. विद्या ठाकूर यांनी सांगितलं.

संपादन : शर्वरी जोशी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

स्वतःला देशभक्त म्हणवता? मग यातील कोणकोणते चित्रपट तुम्ही पाहिलेत?

Hockey World Cup: पेनल्टी कॉर्नर ठरले भारताचे अस्त्र! स्वातंत्र्यदिनी वेल्सला हरवत विजयी सुरुवात

Crime: एका संशयाने नात्याला काळिमा! सासू आणि पत्नीच्या वादातून संताप अनावर; जावयाने उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?

SCROLL FOR NEXT