मुंबई: शहरात कोविडचा फास अधिक आवळला जात आहे. शुक्रवारी मुंबईत १८६ दिवसात कोविडचे रुग्ण दुप्पट होत होते. तर १५ माार्चच्या नोंदीनुसार हा कालावधी १५६ दिवसापर्यंत खाली आला आहे. सर्वात कमी कालावधी अंधेरी जोगेश्वरी पश्चिम के पश्चिम प्रभागत असून येथे १०८ दिवसात रुग्ण दुप्पट होत आहेत. मुलूंड येथे ११५ दिवसात रुग्ण दुप्पट होत आहेत.
शुक्रवारी (१२ मार्च)ला चार प्रभागात रुग्ण दुप्पट होण्याचा दर ३०० दिवसांच्या पुढे होता. मात्र आता सर्वच २४ प्रभागात हा दर ३०० दिवसांच्या आत आहे. के पश्चिम प्रभागात या दिवशी रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी १३५ दिवसांचा होता. तो सोमवारी ११५ दिवसांवर आला आहे. तर टी प्रभागातील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी १२० दिवसांवरुन १०८ दिवसांवर आला आहे. महानगर पालिका आणि राज्य सरकार पुढील काही दिवस मुंबईतील रुग्णसंख्येवर लक्ष ठेवणार आहे. त्यानंतर अधिक कठोर निर्णय घेण्यात येणार आहे.
यात रात्रीच्या संचारबंदी सारखा निर्णय होऊ शकतो, असे संकेत मिळत आहेत. 'कोविडच्या रुग्णवाढीवर लक्ष असून आवश्यक निर्णय घेण्यात येत आहेत', असे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. सध्या सापडत असलेले रुग्ण उच्चभ्रू वस्त्या आणि इमारतींमधील जास्त आहेत. त्यामुळे सर्व प्रभागांमार्फत इमारतींच्या पदाधिकाऱ्यांना लेखी सूचना पाठवून खबरदारी बाबत निर्देशही देण्यात आले आहेत.
मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
या सहा प्रभागांवर नजर
टी आणि के पश्चिम बरोबरच चेंबूर एम पश्चिम, एच पश्चिम वांद्रे खार पश्चिम, एफ उत्तर दादर पूर्व माटूंगा शिव, पी उत्तर गोरेगाव या प्रभागात रुग्णवाढीचा दर अंदाज पेक्षा जास्त आहे. एम पश्चिम प्रभागात ११६ दिवसात, एच पश्चिम प्रभागात १२१ दिवसात, एफ उत्तर प्रभागात १२७ दिवसात आणि पी दक्षिण प्रभागात १२९ दिवसात रुग्ण दुप्पट होत आहेत. तर शुक्रवारी एम पश्चिम प्रभागात १४८ दिवस, एच पश्चिम प्रभाग १५० दिवस, एफ उत्तर प्रभाग १६० दिवस आणि पी दक्षिण प्रभाग १६६ दिवस रुग्ण दुप्पटीच्या कालावधी होता.
वरळीत तीन दिवसात ८९ दिवसांची घट
मुंबईतील पहिला हॉटस्पॉट असलेल्या वरळीत रुग्णवाढीचा वेग वाढला आहे. शुक्रवारी येथे ३२२ दिवसात रुग्ण दुप्पट होत होते. तर मंगळवारी २३३ दिवस रुग्ण दुप्पटीचा दर आला आहे. तीन दिवसात रुग्ण दुप्पट होण्याचा दर ८९ दिवसांनी घटला आहे. एफ दक्षिण लालबाग परळ येथे रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ३२६ दिवसांवरुन २६८ दिवसांवर आला आहे. तब्बल ५८ दिवसांची घट झाली आहे.
------------------------------
(संपादन- पूजा विचारे)
Mumbai Corona Virus duration of patient doubling was reduced by 30 in three days
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.