मुंबई

मुंबईत पुन्हा कोरोनाचा प्रार्दुभाव? दिवसागणिक वाढतेय कोरोना रुग्णांचा संख्या

मिलिंद तांबे

मुंबई: मुंबईत शनिवारी 1253 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 3 लाख 9 हजार 431 रूग्ण बरे होऊन घरी गेले. मुंबईत आर मध्य, के पश्चिम आणि आर दक्षिण विभागात बरे झालेल्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. काल 1188 नव्या रुग्णांची भर पडली. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 3 लाख 32 हजार 204 झाली आहे. 

मुंबईत काल 5 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. एकूण मृतांचा आकडा 11 हजार 495 इतका झाला आहे. रुग्ण बरे होण्याचा दर हा 93 टक्के इतका झाला आहे. तर रुग्ण दुपटीचा दर खाली घसरला असून 237 दिवसांवर आला आहे.

मुंबईत दैनंदिन चाचण्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. तर कोविड रुग्णवाढीचा दर वाढून 0.29 इतका झाला आहे. आतापर्यंत पर्यंत एकूण 33 लाख 93 हजार 392 कोविड चाचण्या करण्यात आल्या.

मुंबईत काल मृत झालेल्या रुग्णांपैकी  4 रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मृत्यू झालेल्यांपैकी 2 पुरुष तर 3 महिला रुग्णाचा समावेश होता. मृतांपैकी एकाचे वय 40 वर्षा खालील होते. एकाचे वय 40 ते  60 च्या दरम्यान होते तर 3 रुग्णांचे वय 60 वर्षा वर होते.

मुंबईत 15 इमारती आणि झोपडपट्टया कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले असून सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 174 इतकी आहे. बाधित रूग्णांच्या संपर्कात येणा-या व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत असून गेल्या 24 तासात बाधित रुग्णांच्या संपर्कात 8841 अति जोखमीचे व्यक्ती आले आहेत. काल कोविड काळजी केंद्र 1 मध्ये 443 अति जोखमीचे संपर्क उपचारासाठी दाखल करण्यात आले. 

------------------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

mumbai corona virus updates records 1253 fresh cases 5 deaths

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महागाईचा भडका! घरगुती LGP सिलिंडरच्या दरात वाढ, १४.२ किलो सिलिंडरची नवी किंमत किती

मान्सून महाराष्ट्रात दाखल! पुण्यात पुढील ४ दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता, हवामान विभागाचा 'यलो अलर्ट'

वाहतुकीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं पुन्हा आवाहन, आर्थिक सल्लागार परिषद बैठकीत चर्चा

'माधुरीनं माझ्या पत्नीचे कपडे घालून शूटिंग केलं' : टॅक्सीचेही पैसे नव्हते; अभिनेत्याने केलेला मोठा खुलासा, म्हणालेला...

Success Story : चूल आणि मूल सोडून उभा केला कोट्यवधींचा 'देहाती' ब्रॅंड! ग्रामीण पर्यटनाचे नवे केंद्र बनतेय हे गाव

SCROLL FOR NEXT