corona corona
मुंबई

मुंबईत कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी तब्बल 722 दिवसांवर

मुंबईत कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी तब्बल 722 दिवसांवर दिवसभरात 570 नवे रूग्ण; 10 रूग्णांचा मृत्यू Mumbai Coronavirus Update Doubling Rate is above 722 days Recovery Rate is 95 percent

सकाळ वृत्तसेवा

दिवसभरात 570 नवे रूग्ण; 10 रूग्णांचा मृत्यू

मुंबई: कोरोना रुग्णवाढीचा सरासरी दर आता 0.9 टक्क्यांपर्यंत खाली आला असून एकेकाळी शंभर दिवसांच्या आत असणारा रुग्ण दुपटीचा कालावधी हा तब्बल 722 दिवसांवर गेला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95% आहे. तर रुग्णसंख्या नियंत्रणात आल्याने सक्रिय रुग्णांचा आकडा कमी होऊन 14,453 हजारांवर आला आहे. मुंबईत दिवसभरात 570 नवीन रुग्ण सापडले. त्यामुळे कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 7,22,461 इतकी झाली. गेल्या २४ तासांत 742 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत 6,90,417 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत 68,73,621 कोरोना चाचण्या करण्यात आल्या. (Mumbai Coronavirus Update Doubling Rate is above 722 days Recovery Rate is 95 percent)

मुंबईत दिवसभरात 10 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. मुंबईतील मृतांचा आकडा 15 हजार 315 इतका झाला आहे. आज मृत झालेल्यापैकी 6 रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मृत्यू झालेल्यांमध्ये 5 पुरुष तर 5 महिला रुग्णांचा समावेश होता. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी एका रुग्णाचे वय 40 च्या खाली होते. आणखी एका रुग्णाचे वय 40 ते 60 वयोगटातील होते तर 8 रुग्णांचे वर 60 वर्षाच्या वर होते.

मुंबईत 11 इमारती आणि झोपडपट्टया कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले असून सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 86 इतकी आहे. बाधित रूग्णांच्या संपर्कात येणा-या व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत असून गेल्या 24 तासात बाधित रुग्णांच्या संपर्कात 9,057 अति जोखमीचे व्यक्ती आले आहेत. आज कोविड काळजी केंद्र 1 मध्ये अति जोखमीचे संपर्क उपचारासाठी दाखल 845 करण्यात आले.

(संपादन- विराज भागवत)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT