coronavirus recovery rate
coronavirus recovery rate Google
मुंबई

मुंबईकरांना दिलासा! दिवसभरातील नवे रूग्ण एक हजारापेक्षा कमी

सकाळ वृत्तसेवा
  • मृतांचा एकूण आकडा १५ हजारांपार

मुंबई: शहरातील रूग्णसंख्या हळूहळू कमी होत असून दिवसभरात एक हजाराहून कमी नवे रूग्ण आढळले. शनिवारी 24 तासांच्या कालावधीत 866 नवीन रुग्ण सापडले तर 1 हजार 45 रुग्णांनी कोरोनावर मात केली. मुंबईतील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 7,10,807 इतकी झाली आहे. आतापर्यंत 63,89,665 कोरोना चाचण्या करण्यात आल्या. कोरोना रुग्ण वाढीचा सरासरी दर 0.13 टक्क्यांवर आला आहे. रुग्ण दुपटीचा कालावधी ही कमी होऊन 511 दिवसांवर आला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असून रिकव्हरी रेट 95 टक्क्यांवर पोहोचला आहे. मुंबईत आज दिवसभरात 29 रुग्णांचा मृत्यूची नोंद झाल्याने मृतांचा आकडा 15 हजार 018 वर पोहोचला. (Mumbai Coronavirus Updates New Cases Below Thousand Overall Deaths cross 15000 mark)

रुग्णसंख्या नियंत्रणात आल्याने सक्रिय रुग्णांचा आकडा कमी होऊन 16,133 हजारांवर आला आहे.मुंबईत आज 1045 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत 6,77,445 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. मुंबईत 27 इमारती आणि झोपडपट्टया कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले असून सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 116 इतकी आहे. बाधित रूग्णांच्या संपर्कात येणा-या व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत असून गेल्या 24 तासात बाधित रुग्णांच्या संपर्कात 10,329 अति जोखमीचे व्यक्ती आले आहेत. आज कोविड काळजी केंद्र 1 मध्ये अति जोखमीचे संपर्क उपचारासाठी दाखल 861 करण्यात आले.

धारावी, दादरमध्ये प्रत्येकी 3 नवे रुग्ण

धारावीत आज 3 नवीन रुग्ण सापडले असून एकूण रुग्णांची संख्या 6,833 वर पोहोचली आहे. दादर मध्ये आज 3 नव्या रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णांची संख्या 9,479 झाली आहे. माहीम मध्ये 2 रुग्ण सापडले असून एकूण रुग्ण 9,814 इतके रुग्ण झाले आहेत.जी उत्तर मधील रुग्णसंख्या कमी झाली आहे. जी उत्तर मध्ये आज 8 नव्या रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णसंख्या 26,126 झाली आहे.

संपादन- विराज भागवत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

MI vs KKR Live IPL 2024 : व्यंकटेश अय्यर - मनिष पांडेने केकेआरचा डाव सावरला; 15 षटकात मारून दिली चांगली मजल

SSC-HSC Result 2024 : सीबीएसईचा दहावी-बारावीचा निकाल २० मे नंतर होणार जाहीर

West Indies T20 WC 24 Squad : विंडीजच्या संघात सगळे स्टार मात्र इन फॉर्म जादूगारच मिसिंग

Latest Marathi News Live Update : जीएसटी फक्त अदानींच्या फायद्याचा- राहुल गांधी

SCROLL FOR NEXT