Cosmos Bank sakal
मुंबई

Mumbai : गृह कर्ज मंजुर करुन घेत बॅंकेची 6 कोटी 30 लाखाला फसवणूक

कल्याण मधील कॉसमॉस बँकेला गंडा याप्रकरणी खडकपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली

शर्मिला वाळुंज

डोंबिवली : गृह कर्ज मंजुर करुन घेण्यासाठी बॅंकेकडे बनावट कागदपत्रे सादर करुन दोन खासगी कंपन्या, 26 कर्जदार, विकासक यांनी कॉसमॉस बॅंकेची तब्बल 6 कोटी 30 लाखाला फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी खडकपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून याचा अधिक तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे.

कॉसमॉस बॅंकेच्या कल्याण शाखेत मध्ये कोरवी अग्रो कंपनीचे संचालक कोकरे व क्रक्स रीक्स मॅनेजमेंट या कंपनीचे संचालक, 26 कर्जदार, श्री सिध्दीविनायक डेव्हलपर्स, श्री साईराज बिल्डर, साई सृष्टी बिल्डर, संस्कृती बिल्डर्स, कर्ज मंजुरीतील मध्यस्थ उमेश भाईप, यांनी आपआपसात संगमनत करुन बॅंकेची फसवणूक केली आहे. जुलै 2021 पासून हे कर्ज मंजुरीचे प्रकरण सुरू होते. बँकेचे फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच काॅसमाॅस बँकेचे वरिष्ठ अधिकारी शरद बेदाडे यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात सोमवारी तक्रार दाखल केली आहे. दाखल तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला असून अधिक तपासासाठी आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे तो वर्ग करण्यात आला आहे.

कॉसमॉस बॅंकेकडून कर्जदारांची 26 कर्जदारांनी गृह कर्ज मंजुर करुन घेण्यासाठी कोरवी ॲग्रो प्रा. लिमिटेड कंपनीने प्रस्ताव तयार केला होता. ही कर्ज मंजुरीची प्रक्रीया पूर्ण करण्यासाठी सल्लागार म्हणून उमेश भाईप यांनी काम पाहीले. कर्ज मंजुरीसाठी बॅंकेस नमुद कर्जदारांच्या घरांची किंमत तत्कालीन रेडीरेकनर दरापेक्षा वाढवून रीसेल फ्लॅट चे नविन अग्रीमेंट विकासक सिध्दीविनायक डेव्हलपर्स, साईराज बिल्डर्स, साई सृष्टी बिल्डर्स, संस्कृती बिल्डर्स यांनी तयार करुन दिली. कर्जदारांची योग्य पडताळणी करण्यासाठी बॅंकेने तिसरा पक्ष म्हणून क्रक्स रिक्स या कंपनीची नेमणूक केली.

या सर्वांनी मिळून बॅंकेची फसवणूक केली आहे. कर्ज मंजुर झाल्यानंतर बॅंकेचे हप्ते कर्जदारांनी न भरल्याने कागदपत्रांची पडताळणी केली असता ते बनावट असल्याचे बॅंकेच्या लक्षात आले. त्यानंतर काॅसमाॅस बँकेचे वरिष्ठ अधिकारी शरद भिकाजी बेदाडे यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात सोमवारी तक्रार केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virat Kohli Century : विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड! KKR विरुद्ध शतकी खेळी अन् आशियात कोणालाच न जमलेला केला पराक्रम...

IPL 2026 : चेन्नई सुपर किंग्सला खूप मोठा धक्का! मॅच विनर खेळाडूला दुखापत, उपचारासाठी लंडनला जाणार; स्पर्धेतून माघार निश्चित

IPL 2026 Playoff Scenario: विराट कोहलीचा झंझावात अन् RCB गुणतालिकेत अव्वल! KKR चे आव्हान संपले का? जाणून घ्या समीकरण

RCB VS KKR LIVE: विराट कोहलीची पहिली धाव अन् सेलिब्रेशन जणू Century सारखं, चाहत्यांना हसू आवरेना... Viral Video ची मजेशीर गोष्ट

Milk Rate Hike: महागाईचा आणखी एक फटका! अमूलनंतर मदर डेअरीनेही दूध दर वाढवले, किती रुपयांनी? बजेट कोलमडणार

SCROLL FOR NEXT