qatar couple  
मुंबई

ड्रग्ज प्रकरण: कतारमध्ये शिक्षा भोगणारं जोडपं मुंबईत परतलं

हनीमुनसाठी दोघे कतारला गेले होते

दीनानाथ परब

मुंबई: ड्रग्ज तस्करीच्या खोट्या गुन्ह्यांत अडकवण्यात आल्यानंतर कतारमध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले दांपत्य आपल्या मुलीसह गुरूवारी मुंबईत परतले. केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाने(एनसीबी) परराष्ट्र विभागाच्या माध्यमांतून स्थानिक न्यायालयात पुन्हा सुनावणी घेण्याची मागणी केली होती. त्यानुसार झालेल्या सुनावणीत न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली होती. मोहम्मद शरीक व त्याची पत्नी ओनिबा कौसर 2019 जुलै महिन्यात हनीमुनसाठी कतार येथे गेले होते. त्यावेळी हमाद विमानतळावर त्यांच्याकडील बॅगेत चार किलो हशीश सापडली. ती बॅग शरिकच्या एका नातेवाईक महिलेने त्यांच्याकडे दिली होती.

जलदगती न्यायालयाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. शिक्षेत असताना त्यांना एक मुलगीही झाली. याप्रकरणी ओनिबा यांचे वडील शकील कुरेशी यांनी शरीकची मावशी तब्बसूम कुरेशी व तिचा साथीदार निजाम कारा यांनी त्यांना याप्रकरणी अडकवल्याची तक्रार एनसीबीकडे केली होती. हनीमुनसाठी आरोपींनी या दांपत्याला परदेशात पाठवले व त्यांना माहिती न देता त्यांच्या सामानात अंमली पदार्थ लपवले. यावेळी त्यांनी महत्त्वाचे पुरावे व संभाषण सादर केले आहे.

आरोपी महिलेने जर्दा असल्याच्या नावाखाली त्यांच्या बॅगेत हशीश ठेवले होते. त्याप्रकरणी एनसीबीच्या तपासात कारा याने तबस्सूमच्या मदतीने हा सर्व प्रकार घडवून आणल्याचे स्पष्ट झाले. कारा व तबस्सूम दोघांनाही 2019 मुंबई पोलिसांना अटक केली होती. त्याप्रकरणी आरोपींची जामिनावर सुटका झाल्यानंतर गेल्यावर्षी दोघांना एनसीबीने अटक केली आहे. त्यावेळी चौकशीत आरोपींनी गुन्हा कबुल केला असून त्यांनी या दांपत्याच्या माहितीशिवाय त्यांचा वापर तस्करीसाठी केल्याचे सांगितले. त्यांना जर्दा असल्याचे सांगून हशीश देण्यात आले.

याप्रकरणी आता एनसीबी सर्व पुरावे कतारच्या संबंधीत यंत्रणाना पाठवणार असून त्यांना या प्रकरणी नातेवाईकांना अडकवल्याची माहिती देण्यात येणार आहे. एनसीबीचे महासंचालक राकेश अस्थाना यांनी मुंबईत येऊन या सर्व कार्यवाहीची पडताळणी करून परराष्ट्र विभागाच्या माध्यमातून न्यायालयीन लढा सुरू केला. त्याला यश आले असून कतारमधील याप्रकरणी नव्या पुराव्यांच्या आधारावर पुन्हा सुनावणी करण्याची मागणी मान्य केली होती. त्यानुसार एनसीबीने सादर केलेल्या नव्या पुराव्याच्या आधारावर कतारमधील न्यायालयाने त्यांची निर्दोष सुटका केली होती. त्यानंतर दोघेही गुरूवारी पहाटे आडीचच्या सुमारास मुंबई परतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi AI video: पंतप्रधान मोदी अन् त्यांच्या आईंचा 'AI' व्हिडिओ प्रकरणी, आता काँग्रेस 'IT' सेलच्या नेत्यांविरुद्ध 'FIR' दाखल!

Umarga News : आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाजातील तरुणाने संपविले जीवन

Heavy Rain : शेलगाव (ज.) मध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने धुमाकूळ; लोकांच्या घरात शिरले पाणी

Anurag Thakur : जेव्हा देशाला गरज असते तेव्हा गांधी दांड्या मारतात; अनुराग ठाकूर यांची टीका

Beed Crime: बीडच्या परळीमध्ये धक्कादायक घटना! पोट फाडून पत्नीचा खून; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT