corona update corona update
मुंबई

Mumbai Covid News : मुंबईत कोवीड रुग्णांच्या संख्येत वाढ ; एका आठवड्यात गाठली शंभरी

Mumbai Covid News :

सकाळ डिजिटल टीम

Mumbai Covid News : गेल्या काही दिवसांपासून कमी झालेला कोरोनाचा प्रादुर्भाव आता मुंबईमध्ये पुन्हा एकदा वाढताना पाहायला मिळत आहे. याचे कारण म्हणजे गेल्या आठवड्याभरात मुंबईमध्ये कोरोना व्हायरसचा आलेख उंचावला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार कोरोनाची लागण झालेल्या सक्रिय रुग्णांची संख्या १०० हून अधिक आहे. गेल्या आठवड्यात ए वॉर्ड आणि बी वॉर्ड वगळला तर इतर २२ वॉर्डांमध्ये कोविडचे एक आणी दोन अंकी रुग्ण आढळले आहेत.

मिळालेल्या आकडेवारीनुसार सक्रीय रुग्णांची संख्या 107 वर पोहोचली आहे. गेल्या एका आठवड्यात मुंबईमध्ये कोविड ने पुन्हा एकदा डोके वर काढले असून पालिका आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार 27 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर दरम्यान मुंबई मध्ये १०७ नवीन रुग्ण आढळले आहेत. ज्यापैकी नऊ जण आयसीयू मध्ये आहेत तर एक जण व्हेंटिलेटर वर आहे.

गेल्या एका आठवड्यात मुंबईत २४ पैकी २२ वॉर्डां कोविडचे रुग्ण आढळून आले आहेत. वांद्रे पश्चिम म्हणजेच ए वॉर्ड मध्ये १३ रुग्ण आढळून आले आहेत. डी वर्ड येथे १२ रुग्ण. के पश्चिम मध्ये आठ रुग्ण, के पूर्वमध्ये बारा रुग्ण, इ वॉर्डंमध्ये आणी ए वर्ड मध्ये ६ रुग्ण आढळून आले आहेत.

याबाबत बॉम्बे रुग्णालयाचे सल्लागार फिजिशियन असलेले डॉ. गौतम भन्साळी यांनी सांगितले की युके आणि युएस मध्ये कोविडचे रुग्ण वाढत आहेत. यात थोडीशी वाढ होण्याची शक्यता आहे. ज्या प्रकारे स्वाइन फ्लूची संख्या कोणत्याही वर्षात वाढते याच प्रकारे कोविड बाबतीतही आपण तेच पाहू शकतो

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latur Extortion Case: डॉक्टरकडे खंडणी मागणारे तिघे अटकेत; लातूर शहरामध्ये कारवाई, एकूण सात जणांविरुद्ध गुन्हा

Major Mohit Sharma: भारताचा खरा 'धुरंधर' मोहित शर्मा जेव्हा इफ्तिखार भट्ट झाला, काश्मिरमध्ये काय घडलं होतं?

Latest Marathi News Update LIVE : शितल तेजवानी पुणे पोलिस आयुक्तालयात दाखल

सिनेमा फक्त त्यांच्या लव्हस्टोरीबद्दल कसा दाखवता? 'बाजीराव मस्तानी' चित्रपटावर शरद पोंक्षे म्हणतात- 'केवळ ब्राह्मणद्वेषातून…'

ताम्हिणी घाटात थार दरीत कोसळून ६ जणांचा मृत्यू, ३ दिवसानंतर अपघात झाल्याचं आलं समोर

SCROLL FOR NEXT