Pregnant Women Google
मुंबई

मुंबई: कोविडमुळे बाळंतपणादरम्यान मातांच्या मृत्यूचं प्रमाण जास्त

मृत्यूला हॅमरेज, सेप्सिस, हायपरटेन्सिव्ह डिसॉर्डर आणि टीबी हे आजार प्रामुख्याने कारण असायचे.

दीनानाथ परब

मुंबई: काहीवेळा बाळंतपणामध्ये शारीरिक व्याधींमुळे (dieseaes) आईचा मृत्यू होतो. मागची काही वर्ष मुंबईत प्रसुतीनंतर (infant delivery) होणाऱ्या मातांच्या मृत्यूला (maternal mortality) हॅमरेज, सेप्सिस, हायपरटेन्सिव्ह डिसॉर्डर आणि टीबी हे आजार प्रामुख्याने कारण असायचे. पण २०२०-२१ मध्ये मुंबईत प्रसुतीनंतर कोविड-१९ (covid-19) मुळे मातांच्या मृत्यू होण्याचे प्रमाण जास्त आहे. एप्रिल २०२० ते मार्च २०२१ मध्ये मुंबईत बाळंतपणामध्ये १९३ मातांचे मृत्यू झाले. (Mumbai Covid now the leading cause of death among new moms)

यात १६.५ टक्के मृत्यू हे कोविडमुळे झाले आहेत. सेप्सिस हा रक्ताशी संबंधित आजार आहे. सेप्सिसमुळे १२ टक्के महिलांचा मृत्यू झाला. हायपरटेन्सिव्ह डिसॉर्डर आणि टीबीमुळे प्रत्येकी ८.८ टक्के मातांचा मृत्यू झाला. ह्दयविकारामुळे ४ टक्के महिलांचा बाळंतपणा दरम्यान मृत्यू झाला. चेतन कोठारी यांनी आरटीआयमधून ही माहिती मिळवली आहे.

२०२०-२१ मध्ये बाळंतपणादरम्यान १९३ मातांचे मृत्यू झाले. २०१९-२० च्या तुलनेत या मध्ये २० टक्के घट झाली. २०१९-२० मध्ये २४१ मातांचे बाळंतपणा दरम्यान मृत्यू झाले होते. २०१९-२० मध्ये कोविड येण्याआधी बाळंतपणामध्ये १२.५ टक्के मृत्यू हे हॅमरेजमुळे झाले. १० टक्के हेपाटिटिस, ८ टक्के सेप्सिस आणि सात टक्के मृत्यू हे हायपरटेन्सिव्ह डिसॉर्डरमुळे झाले. कोविड येण्याआधी टीबीमुळे ५.५ टक्के मृत्यू झाले तर २०२०-२१ मध्ये हे प्रमाण वाढून ८.८ टक्के झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI व्यवहारांवर द्यावे लागणार शुल्क; नीती आयोगाच्या उपाध्यक्षांचे संकेत, कारणही सांगितलं...

Karmad News : उघड्या लिफ्टमधून बियाण्याची पोती नेताना तरुणाचा मृत्यू; कंपनी मॅनेजर, एचआर अधिकारी व कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा

Delhi Police IPS Transfers : दिल्ली पोलिस दलात मोठा फेरबदल; 5 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे नियुक्ती? पाहा बदल्यांची यादी

Bogus Doctor Crime : वारजे, खराडीत बोगस डॉक्टरांवर कारवाई; मनपाच्या बोगस वैद्यकीय व्यावसायिक शोध समितीची कारवाई

Latest Marathi News Live Update : परवानगी नाकारली तरी मुंबईत जाणारच; जरांगेंचा निर्धार

SCROLL FOR NEXT