Corona Vaccination sakal
मुंबई

आजपासून फिरते कोविड लसीकरण पथक

प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी ठरणार उपयुक्त

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : आजपासून मुंबईतील काही भागांमध्ये फिरते कोविड लसीकरण पथक सुरु करण्यात आले आहे. पालिकेच्या जी उत्तर विभागात फिरते कोविड लसीकरण पथकाची सोय करण्यात आली असून प्रत्यक्ष जागेवर नोंदणी व लसीकरण , तसेच 18 वर्षांवरील नागरिकासाठी पहिला व दुसरा डोस उपलब्ध करुन देण्यात आला आहे. कोव्हिशिल्ड ही लस या पथकाद्वारे दिली जाईल. तज्ज्ञ वैद्यकीय पथकाच्या उपस्थितीत नागरिकांना लस दिली जाईल.

प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी पालिकेने लसीकरण ऑन व्हील अनेक क्षेत्रांत सुरुवात केली आहे. गर्दीच्या भागात आणि सोसायटी परिसरात, महाविद्यालयाबाहेरही सेवा सुरू करण्याची तयारी पालिकेने ठेवली आहे.

लसीकरण ऑन याअंतर्गत प्रत्येक प्रभागात सोमवारपासून मोबाईल लसीकरण युनिट सुरू करण्यात आले आहे. अनेक वॉर्डांमध्येही सुरू झाले आहे, तर काही वॉर्डांमध्ये ते हळूहळू सुरू केले जात आहे.

मुंबईत लसीकरणासाठी पात्र लाभार्थींपैकी 97 टक्के लोकांना लसीकरणाचा पहिला डोस मिळाला आहे. बीएमसीने ऑक्टोबरच्या अखेरीस सर्व लाभार्थ्यांना पहिला डोस देण्याचे लक्ष्य ठेवले आहे. हे पूर्ण करण्यासाठी, लसीकरण ऑन व्हील्स सुरू करण्यात आले आहे. याअंतर्गत, सोमवारी दादर परिसरातील हाऊसिंग सोसायटी परिसरात या फिरत्या लसीकरण युनिटद्वारे लसीकरण करण्यात आले. लसीचे दुष्परिणाम झाल्यास तत्काळ उपचारासाठी या मोबाईल व्हॅनमध्ये 'एईएफआय'ची व्यवस्थाही करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे अंधेरी-पश्चिम प्रभागातील बेस्ट एसी बसमध्ये मोबाईल लसीकरण युनिट सुरू करण्यात आले आहे.

प्रभाग आरोग्य अधिकारी डॉ.अजित पम्पटवार म्हणाले की, या युनिटचा वापर गर्दीच्या भागात, पुलाखालील बेघर, मंदिर परिसरांमध्ये केला जातो. हे मोबाईल लसीकरण युनिट सकाळी 10 ते रात्री 8 पर्यंत कार्यरत राहते. लोकांना येथे 'वॉक इन' सुविधेद्वारे कोरोनाची लस मिळू शकते. आतापर्यंत 400 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. या लसीकरण युनिटसह एक रुग्णवाहिका देखील उपस्थित आहे जेणेकरून दुष्परिणाम झाल्यास रुग्णाला त्वरित जवळच्या रुग्णालयात दाखल करता येईल. येत्या काळात हे मोबाईल लसीकरण युनिट महाविद्यालयाबाहेर कार्यरत केले जाईल.

आर- दक्षिण वॉर्ड वैद्यकीय अधिकारी डॉ. नाझनीन खान यांनी सांगितले की, सध्या प्रभागात मोबाईल लसीकरण युनिट सुरू करण्यात आलेले नाही, परंतु येत्या बुधवारी आणि शुक्रवारी झोपडपट्टी भागात लसीकरण शिबिरे सुरू केली जातील. या शिबिराद्वारे झोपडपट्टी मधील नागरिकांचे लसीकरण केले जाईल.

पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी म्हणाले की, लसीचा पहिला डोस उर्वरित लाभार्थ्यांना देण्यासाठी आणि दुसऱ्या डोसचा आलेख वाढवण्यासाठी व्हॅक्सीनेशन ऑन व्हील्स मोहीम सुरू करण्यात आली आहे. सर्व वॉर्डांच्या सहाय्यक आयुक्तांना त्यांच्या संबंधित प्रभागांमध्ये मोबाईल लसीकरण युनिट आणि लसीकरण शिबिरे आयोजित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke MPSC : धर्म-जातीच्या नावावर मत मागता, पण शिक्षणाचं काय?’; पुण्यातील एमपीएससी आंदोलनात अभिजीत दिपकेंचा सवाल

GST Council : GSTचे नियम बदलणार? 9 गुन्हे वगळण्याचा प्रस्ताव, अटक प्रक्रियेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता

IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

SCROLL FOR NEXT