student girl assault 
मुंबई

Mumbai Crime: 'तुला मॉडेल बनवतो'; 19 वर्षीय अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीचे नग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी देत लैंगिक अत्याचार

Mumbai Crime student girl assault: अखेर हिंमत करून तिने हा सर्व प्रकार पालकांना सांगितला. त्यानंतर पूर्व उपनगरातील पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कार्तिक पुजारी

मुंबई- मॉडेल बनविण्याच्या भूलथापा देत एका १९ वर्षी विद्यार्थिनीवर बलात्कार केला गेला आहे. या प्रसंगाचे व्हिडिओ आणि मॉडेल होण्यासाठी काढण्यात आलेली नग्न छायाचित्रे व्हायरल होतील अशी धमकी देण्यात आली. शिवाय कुटुंबाची ४५ लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. अखेर हिंमत करून तिने हा सर्व प्रकार पालकांना सांगितला. त्यानंतर पूर्व उपनगरातील पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अभियांत्रिकेच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या या तरुणीला मार्च महिन्यात हार्दिक नावाच्या व्यक्तीने इन्स्ट्राग्रामवर संपर्क साधला अन् मॉडेलिंग, अभिनयात रस आहे का, अशी विचारणा केली. त्यानंतर तरुणीने त्याचे प्रोफाईल पाहिले. त्यात हार्दिक याने धर्मा प्रोडक्शनशी संबंधित असल्याचे, अनेक नवोदित कलाकारांना संधी दिल्याचे नमूद केले होते. ही व्यक्ती विश्वासार्ह वाटल्याने विद्यार्थिनीने होकार दिला.

तरुणाने त्यानंतर तिला राहुल नावाच्या व्यक्तीला संपर्क साधण्यास सांगितले. राहुलने एकीकडे या विद्यार्थिनीकडून पैसे उकळण्यास सुरुवात केली, तर दुसरीकडे जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. एका जाहिरातीत काम देण्याच्या बदल्यात त्याने एक लाख रुपयांची मागणी केली. तरुणीने स्वतःचे दागिने त्याला दिले.

त्यानंतर राहुलकडून सतत होत असलेली पैशांची मागणी पूर्ण करण्यासाठी विद्यार्थिनीने घरातले सर्वच दागिने त्याच्या हवाली केले. यादरम्यान राहुलने इच्छेविरोधात विद्यार्थिनीसोबत शरीरसंबंध ठेवले. हा प्रकार वारंवार होऊ लागला. राहुलने या प्रसंगाचे चित्रीकरण केले होते.

अन्य दोघांचा शोध सुरू

मॉडेल होण्यासाठी आवश्यक असल्याचे सांगत तरुणीची नग्न, अर्धनग्न छायाचित्रे काढून घेतली होती. ती व्हायरल करण्याची धमकी राहुल देत असे. तसेच, माझे वडील आयपीएस आहेत. पोलीस तक्रार करून काही उपयोग नाही. उलट मी तुझ्या आई - वडिलांना नोकरीवरून काढून टाकेन, अशी धमकीही तो देत असे.

त्यामुळे हा अत्याचार निमूटपणे सहन करण्याशिवाय पर्याय नव्हता, असे या विद्यार्थिनीने पोलिसांना सांगितले आहे. राहुलसोबत हार्दिक आणि श्रेयस या अन्य दोन तरुणांनीही धमकावून शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप विद्यार्थिनीने पोलीस तक्रारीत केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

U19 World Cup: मुंबईचा आयुष म्हात्रे आता विश्वविजेता कर्णधार! मोहम्मद कैफ, विराट कोहलीच्या पंक्तीत मिळवलं स्थान

U19 World Cup: सचिन तेंडुलकर ते विराट कोहली... आयुष म्हात्रेच्या चॅम्पियन टीमबद्दल अन् वैभव सूर्यवंशीबद्दल कोण काय म्हणालं? पाहा

U19 World Cup: आयुष म्हात्रेच्या टीम इंडियाने जगज्जेतेपद जिंकताच कसं केलं सेलिब्रेशन; Video Viral

आज मतदान! मोबाईल घेऊन जाऊ नका, फोटो-व्हिडिओ काढल्यास दाखल होईल गुन्हा; एकच बॅलेटवर दोन्ही उमेदवार, मतदान कसे करायचे? ‘हे’ ओळखपत्र असेल तरी करता येईल मतदान

बापरे! दिव्या शिंदेला बिग बॉसने काढलं घराबाहेर, जीवे मारण्याची दिली धमकी, नक्की काय घडलं?

SCROLL FOR NEXT