mumbai crime 
मुंबई

Mumbai Crime: CSMT स्टेशन येथे सामूहिक बलात्कार झालेली 29 वर्षीय महिला बेपत्ता; पोलिसांकडून शोध सुरु

Mumbai Crime News: सदर प्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे. बलात्कार पीडित महिला बेपत्ता झाल्याची माहिती मिळत आहे. पीडित महिला ही दादरमधील एका एनजीओमध्ये काम करते.

कार्तिक पुजारी

मुंबई- सीएसएमटी स्थानकाजवळ जीपीओ येथे एका २९ वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. याप्रकरणी सीएसएमटी पोलिसांनी दोन अज्ञात आरोपींविरोधात सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. घटना पी डीमेलो रोडवर घडली असल्याने पुढील तपास एमआरए मार्ग पोलीस स्टेशनकडे ट्रान्सफर करण्यात आले आहे.

सदर प्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे. बलात्कार पीडित महिला बेपत्ता झाल्याची माहिती मिळत आहे. पीडित महिला ही दादरमधील एका एनजीओमध्ये काम करते. तक्रार दाखल केल्यानंतर महिला बेपत्ता झाली आहे. त्यामुळे पोलीस महिलेचा शोध घेत आहेत. 'फ्री प्रेस जर्नल'ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर घटना २२ सप्टेबरच्या रात्री घडली आहे. सीएसएमटी रेल्वे पोलिसांना दिलेल्या जबाबात महिला म्हणाली आहे की, ती सीएसएमटी बस डेपोच्या बाजूला उभी होती. त्यावेळी दोन व्यक्ती त्या ठिकाणी आले. एका आरोपीने तिचा गळ्याला धरले आणि दुसऱ्याने तिला तिथे उभ्या असलेल्या टॅक्सीमागे नेले. त्याठिकाणी तिच्यावर बलात्कार करण्यात आला.

महिलेने सुरुवातील सीएसएमटी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. त्यानंतर सदर प्रकरण एमआरए मार्ग पोलीस स्टेशनकडे वर्ग करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधिकारी चौकशी संदर्भात काल दादरमधील एनजीओमध्ये पोहोचले होते. पण, त्या ठिकाणी त्यांना पीडित महिला आढलून आली नाही.

पीडित महिला ही एनजीओच्या निगराणीखाली राहत होती. ही एनजीओ भोईवाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत येते. या एनजीओमधून महिला सकाळी ८ ते ९ च्या दरम्यान पळाल्याचा संशय आहे. याप्रकरणी एमआरए मार्ग पोलीस सीसीटीव्ही तपासच आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी बेपत्ता झाल्याची तक्रार अद्याप एनजीओकडून देण्यात आलेली नाही. पोलीस पुढील कार्यवाही करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly election results 2026 Live Update: बारामतीत करुणा मुंडे -बिचुकलेंना किती मते मिळाली? नोटाला किती?

Infrastructure Success: ऋतुजा नागटिळक-ढोक ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पात चमकली; जगातील लांब बोगदा प्रकल्पात महत्त्वाची भूमिका, बहुराष्ट्रीय कंपनीत मॅनेजर!

Chhatrapati Sambhajinagar: अफवांमुळे गॅस बुकिंगसाठी ग्राहकांची ऑनलाइन झुंबड;सोशल मीडियावर फिरताहेत दरवाढीचे मेसेज

IPL 2026: हार्दिक, सूर्यकुमारच्या फॉर्मवर लक्ष; मुंबई लखनौमध्ये आज लढत, तळाच्या संघांमध्ये झुंज, पाहा कशी असेल Playing XI

PAN Rule: आता या कामांसाठी PAN कार्ड बंधनकारक! Form 60 बंद, Form 97 लागू; जाणून घ्या पॅनचे नवे नियम

SCROLL FOR NEXT