Mumbai Crime 8 house burglaries in two months Manpada police caught thief  sakal
मुंबई

Mumbai Crime News : दोन महिन्यात 8 घरफोड्या... मानपाडा पोलिसांनी चोराच्या आवळल्या मुसक्या

लॉकडाऊन नंतर कल्याण डोंबिवलीकडे मोर्चा

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - कल्याण डोंबिवली परिसरात गेल्या काही महिन्यांपासून घरफोडीचे प्रमाण वाढले आहे. वाढत्या घरफोड्या रोखण्यासाठी विशेष पथक स्थापन करत अट्टल चोरांचा शोध सुरु केला असून मानपाडा पोलिसांनी शंकर सूर्यवंशी उर्फ धोत्रे उर्फ चेनाळे (वय 26) या सराईत चोरास अटक केली आहे.

शंकरने लॉकडाऊन नंतर कल्याण डोंंबिवलीत दोन महिन्यात तब्बल 8 घरफोड्या केल्याची बाब उघड झाली आहे. शंकरने केलेल्या 10 गुन्ह्यांची उकल करत पोलिसांनी त्याच्याकडून 200 ग्रॅम वजनाचे सोन्या चांदिचे दागिने व 12 लाखाचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती कल्याण परिमंडळ 3 चे पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी दिली.

रात्रीच्या वेळेस बंद घरांना चोरटे लक्ष करतात परंतू आजकाल दिवसा ढवळ्या चोरीचे प्रमाण वाढले आहे. लॉकडाऊन काळात अनेक चाकरमानी हे घरातून काम करत असल्याने व जनजीवन ठप्प असल्याने या दिवसांत घरफोड्यांचे प्रमाण कमी होते.

परंतू लॉकडाऊन उघडताच चाकरमानी पुन्हा ऑफिसवर रुजू होऊ लागले तसे दिवसा ढवळ्या घरफोड्यांच्या सत्रात वाढ झाली आहे. वाढते घरफोड्यांचे प्रमाण वाढता घरफोडीतील गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्यात विशेष पथकाची स्थापना करण्यात आली आहे.

मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने दोन महिन्यात तब्बल 8 घरफोड्या करणाऱ्या शंकर याला द्वारली गावातून अटक केली आहे.

चौकशीत त्याने मानपाडा, डोंबिवली व विष्णूनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत 10 घरफोड्या केल्याची बाब उघड झाली आहे. 2021 व 2022 मध्ये दोन घरफोड्या त्याने केल्या असून त्यानंतर 2023 मध्ये तब्बल 8 घरफोड्या केल्या आहेत.

शंकर हा अट्टल गुन्हेगार असून यापूर्वी तो मुंबई परिसरात चोरी करत होता. लॉकडाऊन नंतर त्याने कल्याण डोंबिवली परिसरात चोरीचा सपाटा सुरु केला होता. शंकर हा चोरी करण्याच्या परिसरात रेकी करायचा, बंद घरे आणि सुरक्षा रक्षक नसलेली सोसायटी तो हेरायचा. त्यानंतर कटावणी, स्क्रू ड्रायव्हर यांच्या मदतीने कडी कोयंडा सैल करुन घरात प्रवेश करुन तो चोरी करायचा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Teacher suspended : बोगस दिव्यांग प्रमाणपत्रप्रकरणी पाच शिक्षक निलंबित; पूर्वी १८ ते ६० टक्के अपंगत्वाची नोंद; फेरतपासणीत शून्य ते १० टक्के प्रमाण

China Surveillance: ऑपरेशन सिंदूरदरम्यान चिनी उपग्रहांकडून टेहळणी; भारतातील कोणत्या लष्करी तळांवर होती नजर?

Latest Marathi News Live Update : मी सुरक्षित आहे, प्रसारित होत असलेल्या बातम्या खोट्या - जय पवार

WTC 2025-27: दक्षिण आफ्रिकेचं फायनलचं तिकीट जवळपास पक्कं! दुसऱ्या स्थानासाठी भारतासह ३ बलाढ्य संघांमध्ये चुरस

मराठी नृत्यनाट्याच्या प्रेमात पडले पंकज त्रिपाठी; ‘एक तिची गोष्ट’ पाहून कलाकारांना दिली खास दाद

SCROLL FOR NEXT