Solapur Crime News sakal
मुंबई

Mumbai Crime: चालत्या टॅक्सीत १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार!

Chinmay Jagtap

Mumbai Crime: चौदा वर्षीय मुलीचे अपहरण करून चालत्या टॅक्सीत तिच्यावर बलात्कार करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

टॅक्सीचालक श्रीप्रकाश पांडे आणि सलमान शेख अशी आरोपींची नावे असून दोघेही २५ ते २७ वर्षे वयोगटातील आहेत. त्यांना न्यायालयाने २५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मलबार हिल परिसरात राहणाऱ्या पीडित मुलीचे मंगळवारी (ता. १९) रात्री तिच्या कुटुंबीयांशी भांडण झाले होते. त्यानंतर ती रागाने घर सोडून मालवणीत राहणाऱ्या नातेवाईकाकडे जाण्यासाठी टॅक्सीत बसली.

मात्र, टॅक्सीचालक तिला दादरला घेऊन गेला. तिथे त्याने आपला साथीदार सलमानला सोबत घेतले. दरम्यान, मुलगी बेपत्ता झाल्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी मलबार हिल पोलिस ठाण्याशी संपर्क साधून अपहरणाची तक्रार दिली.

मलबार हिल पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. पोलिसांना पीडित मुलगी मालाड परिसरात नातेवाईकाच्या घरी गेल्याचे समजले. तिला घरी आणण्यासाठी पोलिसांचे पथक तिथे पाठवण्यात आले. तेव्हा मुलीने आपल्यासोबत घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला.

पोलिसांनी सीसी टीव्ही फुटेजसह विविध प्रकारे टॅक्सीचा शोध घेण्यासाठी वेगवेगळी पथके तयार केली. त्यानंतर श्रीप्रकाश पांडे आणि सलमान शेख यांना ताब्यात घेण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

K Annamalai: 'मी मुंबईत येणार, हिंम्मत असेल तर पाय कापा'! के. अन्नामलाईंचे राज ठाकरेंना थेट आव्हान; महाराष्ट्रात वातावरण तापलं

Virat Kohli: 'जरी तुम्ही मार खाल्ला तरी...', विराटने नेट गोलंदाजांना नेमका काय दिला मेसेज? Video Viral

Bhogi Special Beauty Tips: भोगीच्या दिवशी असे बनवा तिळाचं उटणं, चेहरा दिसेल चमकदार

Ichalkaranji Election : भाजपमधील नाराजीचा फटका; रखडलेले प्रश्न शिव-शाहू विकास आघाडीला संधी देणार

ATM Transaction Fees : आता ATM मधून पैसे काढणं महागलं! SBI ग्राहकांच्या खिशाला कात्री; व्यवहाराआधी जाणून घ्या नवे शुल्क

SCROLL FOR NEXT