Crime sakal
मुंबई

Mumbai Crime: कारच्या बोनेटवर फटाके लावून कार पळवणाऱ्या तरुणांवर गुन्हा दाखल

वाढदिवसाच्या उत्सवाची अतिरेकी साजरांट, फटाक्यांच्या आतषबाजीमुळे जीवघेणी धावपळ | Excited birthday party celebrants run fatally over firecrackers

सकाळ वृत्तसेवा

Navi Mumbai Crimeछ फॉर्च्युनर कारच्या बोनेटवर आकाशात उडणारे फटाके लावून पामबीच मार्गावर भरधाव कार चालवुन वाढदिवसाचा आनंद साजरा करणे कोपरी गावातील दोघा तरुणांना चांगलेच महागात पडले आहे. या तरुणांनी कारच्या बोनेटवर आकाशात उडणाऱ्या फटाक्यांची आतषबाजी करत सार्वजनिक रस्त्यावर भरधाव कार चालवून इतर वाहन चालकांच्या जीवीतास धोका निर्माण केल्याने त्यांच्या विरोधात एनआरआय पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणांची नावे नयन नंदकुमार पाटील (21) व वंश मिश्रा (21) अशी असून हे दोघेही वाशीतील कोपरी गावात राहण्यास आहेत. गत 29 जानेवारी रोजी नयन पाटील याचा वाढदिवस असल्याने त्याने त्या दिवशी यशवंत पाटील याची फॉर्च्युनर कार चालवण्यास घेतली होती. त्यानंतर नयन पाटील याने मध्यरात्री सदर फॉर्च्युनर कारच्या बोनेटवर आकाशात उडणारे फटाके लावून त्याची आतिशबाजी करत सदर कार पामबीच मार्गावरील किल्ला जंक्शन ते एनआरआय सिग्नल दरम्यान, भरधाव वेगात चालवुन नेली होती.

काही वाहन चालकांनी आपल्या मोबाईलवरुन याचे चित्रिकण केले होते. त्यांनतर सदर व्हिडीओ व्हायरल झाला होता. याबाबतची माहिती एनआरआय पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी सदर फॉर्च्युनर कारचा शोध घेतला असता, 29 जानेवारी रोजी नयन पाटील व त्याचा मित्र वंश मिश्रा या दोघांनी सदरचे कृत्य केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत रस्त्यावरुन येणाऱया जाणाऱया वाहन चालकांच्या जीवीतास धोका निर्माण होईल अस कृत्य करणाऱया नयन पाटील व वंश मिश्रा या दोघां विरोधात गुन्हा दाखल करुन पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

City Disfigurement Award : ‘शहर विद्रूपीकरण पुरस्कार’ भाजप नगरसेवकांना; स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंना प्रथम, सुतारांना द्वितीय, तर पांडेंना तृतीय

Pune Shivajinagar Court Firing Health Update : "पुढचे ७२ तास अत्यंत महत्त्वाचे!" शिवाजीनगर कोर्टाबाहेर हल्ला झालेल्या मंदार किवळेची प्रकृती चिंताजनक; ससूनच्या अधिष्ठात्यांकडून महत्त्वाची माहिती

Online Gaming: PUBG मधून जुळली मैत्री; मग प्रेमाचे नाटक! गेमिंग पार्टनरनेच तरुणीचा गळा आवळला

26/11 Mumbai Attack 18th Anniversary : लाठी घेऊन कसाबच्या गोळ्या अंगावर झेलणारे तुकाराम ओंबळे अन् 'ती' ६० तासांची काळी रात्र! १८ वर्षांनंतरही मुंबईच्या जखमा ताज्या; तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणानंतर कुठवर पोहोचला न्याय?

Meta Congress Meeting Controversy : 'मेटा भाजप का बेटा', मेटा-काँग्रेस बैठकीत जोरदार खडाजंगी! राहुल गांधींच्या पोस्टवर निर्बंध येत असल्याचा काँग्रेसचा आरोप; भारतीय कायद्यांचे पालन करत असल्याचे मेटाचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT