Fraud crime esakal
मुंबई

Crime : फसविण्याची नवी शक्कल! दिल्ली पोलिसांच्या वेशात येऊन घातला कोट्यवधीला गंडा...

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : दिल्ली पोलिसांच्या वेशात येऊन सराफा व्यापाऱ्याच्या कर्मचाऱ्याला कोट्यवधीला गंडा घातल्या प्रकरणी सायन पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. "दिल्ली गुन्हे शाखेचे" अधिकारी म्हणून ओळख सांगणारे चार अज्ञात व्यक्ती गुरुवारी सकाळी ठाण्यात ज्वेलर्स कंपनीत कार्याऱत कर्मचाऱ्याला भेटले.

आपली खोटी ओळख सांगून धमकवून कर्मचाऱ्याकडून 2.62 कोटी रुपयांचे दागिने पळवले. प्रकरणातील पिडीत तक्रारदार हैदराबाद येथील एका ज्वेलर्स कंपनीमध्ये कार्यरत आहे.या प्रकरणी सायन पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.

पिडीत कर्मचारी सायन परिसरात गुरूवारी सकाळी बसची वाट पाहत होता. तेव्हा चार व्यक्ती एका एसयूव्ही गाडीमधून तेथे आले. आपण दिल्ली गुन्हे शाखेचे अधिकारी असल्याचा दावा करत त्या 4 जणांनी पिडीत कर्मचाऱ्याला आपल्यासोबत जाण्यास सांगितले. परंतु त्याने नकार दिला. नकार देताच त्यांनी पिडीत व्यक्तीला एसयूव्ही गाडीमध्ये मध्ये जबरदस्ती करून बसवले आणि गाडी वेगाने चालवत पसार झाले.

वाटेत पिडीत कर्मचाऱ्याला आरोपीनी बेदम मारहाण केली. तसेच त्याच्याकडे असलेले सोन्याचे आणि हिऱ्याने जडलेले दागिने काढून घेत त्याला भिवंडीतील एका रस्त्यावर टाकले. या प्रकरणी सायन पोलीस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd ODI : शुभमन गिलने झळकावले इतिहासातील वेगवान द्विशतक! विक्रमांचा पाऊस अन् टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन सेटवर घसरून पडले, गुडघ्याला दुखापत; उभं राहता येईना, नेमकं काय घडलं?

Pune News: MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला ब्रेक; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर २ ऑक्टोबरचे सत्याग्रह आंदोलन तात्पुरते स्थगित

Rohit Sharma Celebration : शतकानंतर रोहित शर्माच्या सेलिब्रेशनची चर्चा अन् सुनील गावस्कर काय म्हणाले ऐका Video Viral

Sharad Pawar Drought Tour : शरद पवार करणार दुष्काळ दौरा; पुणे जिल्ह्यातील तीन तालुक्यांना देणार भेट

SCROLL FOR NEXT