Crime news esakal
मुंबई

Mumbai Crime : काकाकडून पुतण्याच अपहरण! मुलाची बंगालमधून सुटका

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मुंबईत काकाकडून अपहरण करण्यात आलेल्या पुतण्याची मुंबई पोलिसांनी पश्चिम बंगालमधून सुटका करून आरोपी काकाला अटक केली आहे. दक्षिण मुंबईतील भेंडीबजार परिसरात राहणाऱ्या लालचंद शेख याने आपल्या तीन वर्षांच्या सुमान शेखचेअपहरण केले होते. शनिवारी पश्चिम बंगालमधील छोटा कुलबेरिया जिल्ह्यातून लहान मुलाची सुटका केली.

4 जून रोजी आरोपीने मुलाच्या पालकांच्या परवानगीशिवाय 3 वर्षीय मुलाला घेऊन परागंदा झाला. मुलाच्या आईने 4 जून रोजी जे जे मार्ग पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांकडून अपहरणाचा गुन्हा दाखल करत तपास सुरू करण्यात आला. तपासादरम्यान, पोलिसांना आरोपी पश्चिम बंगालच्या छोटा कुलबेरिया येथे आल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार तत्काळ जेजे मार्ग पोलीसांचे एक पथक पश्चिम बंगालला रवाना झाले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने पोलिसांनी 3 वर्षीय मुलाचा यशस्वी शोध घेतला. पोलिसांनी लहान मुलाला ताब्यात घेतल्यानंतर, मुलाच्या काकालानंतर बडा कुलबेरिया परिसरातून पकडण्यात आले. आरोपीला अपहरण आणि भारतीय दंड संहितेच्या इतर संबंधित तरतुदींनुसार अटक करण्यात आली आहे, मुलाला त्याच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले आहे. अपहरणाचे कारण काय होते याचा तपास पोलीस करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

Anganwadi Boxing: अंगणवाडीत बॉक्सिंगचे धडे! खेड्यातील चिमुकल्यांच्या डोळ्यात ऑलिम्पिकचे स्वप्न; महिला बॉक्सरच्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा

Pension for Widows of Freedom Fighters: स्वातंत्र्यसैनिकांच्या विधवांनाही दरमहा २५ हजार पेन्शन; जाणून घ्या पात्रता अन् अर्ज प्रक्रिया

Nandini Krushak Samruddhi Yojana: गाई खरेदी अन् डेअरी व्यवसायासाठी ३१ लाखांपर्यंत सबसिडी; काय आहे 'नंदिनी कृषक समृद्धी योजना'?

Hair Growth Ladoo: दाट, लांबसडक आणि चमकदार केसांचे सिक्रेट; रोज सकाळी खा फक्त १ 'मॅजिक लाडू'!

SCROLL FOR NEXT