मुंबई

फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये अभिनेत्रीसोबत गैरवर्तन, हॉटेलचा कर्मचारी पोलिसांच्या ताब्यात

पूजा विचारे

मुंबई: मुंबईतल्या एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये एका अभिनेत्रीची छेडछाड केल्याची घटना उघडकीस आली आहे. हॉटेलमधल्या कर्मचाऱ्याने अभिनेत्रीसोबत गैरवर्तन केल्याचं समजतंय. अभिनेत्रीनं या छेडछाडीप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. 

एका वेब सीरिजच्या शूटींगसाठी अभिनेत्री एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये गेली होती. वेब सीरिजचं दिवसभराचं शूटींग संपल्यानंतर अभिनेत्री कपडे बदलण्यासाठी हॉटेलमधील वॉशरुममध्ये गेली होती. त्यावेळी हॉटेलमधील एक कर्मचारी वॉशरुममध्ये आला आणि तिच्यासोबत गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केला. अभिनेत्रीनं या प्रकरणी लोअर परेल येथील एनएम जोशी मार्गावरील पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. 

ही घटना दक्षिण मुंबईतील एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये शनिवारी घडली. हॉटेलच्या ३७ व्या मजल्यावरील एका वॉशरुममध्ये पीडित कपडे बदलण्यासाठी गेली होती. दरम्यान पीडित अभिनेत्रीनं तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी एका २२ वर्षीय संशयित आरोपीला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरु आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवसभराचं शूटींग संपवून पीडित अभिनेत्री वॉशरुममध्ये कपडे बदलण्यासाठी गेली. यावेळी हॉटेलमधील कर्मचारी आणि आरोपी दिलेश्वर महंत याने तिला पकडून तिच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तिनं मदतीसाठी आरडाओरडा करण्याचा प्रयत्न करत होती. मात्र आरोपीनं तिला घट्ट पकडून ठेवलं. 

यावेळी पीडितीनं आरोपीच्या तावडीतून स्वतःची सुटका करुन घेतली आणि वॉशरुमच्या बाहेर येऊन आरडाओरडा केला. त्यानंतर आरोपी महंतला हॉटेलमधील इतर कर्मचाऱ्यांनी चांगलाच चोप दिल्याचं समजतंय. एनएम जोशी मार्ग पोलिसांनी आरोपी दिलेश्वर महंत विरोधात लैंगिक अत्याचारासहित भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Mumbai crime against woman in five star hotel at lower parel

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swati Maliwal Assault Case: केजरीवालांच्या पीएला ५ दिवसांची पोलीस कोठडी, न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

J-K Terrorist Attacks: जम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवादी हल्ले, अनंतनागमध्ये पर्यटक जोडप्यावर गोळीबार, भाजप नेत्याची हत्या

IPL 2024 Playoffs Schedule : प्लेऑफचे शेड्यूल! कुठे अन् कधी कोणत्या संघांमध्ये होणार क्वालिफायर आणि एलिमिनेटर सामने?

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

SCROLL FOR NEXT