crime sakal
मुंबई

Mumbai Crime : कसारा स्थानकातून सराईत दरोडेखोराला अटक, एक चाकू व मोबाईल हस्तगत करण्यात आला

नाशिक येथील पोलिस ठाण्यात दरोड्यासारख्या गंभीर स्वरूपाचे चार गुन्हे दाखल असल्याची माहिती कल्याण रेल्वे पोलिसांनी दिली.

सकाळ डिजिटल टीम

Mumbai Crime - एका सराईत दरोडेखोराला कल्याण रेल्वे पोलिस व रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी कसारा रेल्वेस्थानकातून बेड्या ठोकल्या आहेत.

स्वप्नील गोसावी असे या दरोडेखोराचे नाव असून त्याच्याजवळून दोन काडतूस, एक चाकू व मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे. नाशिक येथील पोलिस ठाण्यात दरोड्यासारख्या गंभीर स्वरूपाचे चार गुन्हे दाखल असल्याची माहिती कल्याण रेल्वे पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळच्या सुमारास कल्याण ते कसारादरम्यान एक तरुण प्रवास करत होता. याच दरम्यान या लोकलमधून प्रवास करणाऱ्या आरपीएफ जवानांचे लक्ष त्याच्याकडे गेले. या तरुणाच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने आरपीएफच्या जवानांनी त्याला हटकले.

या तरुणाची झडती घेतली असता त्याच्याजवळ दोन काडतूस, एक चाकू आणि मोबाईल आढळून आला. आरपीएफने त्याला जागीच ताब्यात घेत कसारा रेल्वेस्थानकात कल्याण जीआरपीच्या ताब्यात दिले.

चौकशीदरम्यान त्याचे नाव स्वप्नील गोसावी असून तो नाशिकच्या दिशेने जात होता. स्वप्नीलविरोधात याआधी नाशिकमधील पोलिस ठाण्यात दरोड्यासारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर ! 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट, जाणून घ्या आज तुमच्या भागात कसे असेल हवामान?

ढिंग टांग : ‘हम्म्मऽऽ’...चा हुंकार!

मानसवेध : तमसो मा ज्योतिर्गमय

विशेष : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भविष्यातील निर्णय

Poha-Rava-Curd Pancake: पोहे नेहमीच बनवता? एकदा करून पाहा पोहे-रवा दही पॅनकेक; चवीला कुरकुरीत, आतून मऊ!

SCROLL FOR NEXT