Crime sakal
मुंबई

Mumbai Crime : अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणी लोढा यांची पोक्सोनुसार कारवाईची मागणी

अल्पवयीन मुलीला तिच्याच परिसरातील एका धर्मांध तरुणाने फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी त्याला मदत करणाऱ्यांवरही पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - भांडूप येथील अल्पवयीन मुलीला तिच्याच परिसरातील एका धर्मांध तरुणाने फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी त्याला मदत करणाऱ्यांवरही पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी काल रात्री शिष्टमंडळासह पोलिस आयुक्तांची भेट घेतली.

याबाबत त्या मुलीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यावर गुन्हेगाराला अटक झाली असली तरी त्याला मदत करणारे त्याचे आई-वडील व अन्य नातलग मोकळेच आहेत. त्यामुळे या सर्वांवर पोक्सो कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी लोढा यांनी निवेदनाद्वारे केली. धर्मांध प्रवृत्तीच्या लोकांकडून महाराष्ट्रात अशी प्रकरणे घडवली जात आहेत. यापूर्वी वसईच्या श्रद्धा वालकरचे तसेच चेंबूरच्या रूपाली चंदनशिवेचे प्रकरणही आपल्यासमोर आहे.

त्यामुळे पुढील काळात अशा घटना टाळण्यासाठी पोलीस खात्याने देखील योग्य तो अहवाल गृह खात्याकडे पाठवून लव्ह जिहाद विरोधी कायदा करण्याबाबत आग्रह करावा, अशी विनंती मुंबई पोलीस आयुक्तांना यावेळी करण्यात आली. तसेच याबाबत कारवाई करण्यास दिरंगाई झाल्यास मुंबईतील मातृशक्तीला नाईलाजाने रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल, असा इशारा देखील देण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CISF जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार, असिस्टंट कमांडंटसह ४ जवानांचा मृत्यू

Vani News : सासरी होणाऱ्या मानहानी अन् छळाला कंटाळून तरुणाने संपविले जीवन; स्टेटसवर व्हिडिओ ठेवत उघड केला प्रकार

Japanese Encephalitis Virus: आसाममध्ये डासांमध्ये जपानी मेंदूज्वराचा जी-१ विषाणू प्रथमच आढळला; ‘एनआयव्ही’ पुण्याचे संशोधन अमेरिकन जर्नलमध्ये प्रकाशित

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

SCROLL FOR NEXT