Mumbai Crime sakal
मुंबई

Mumbai Crime: माथाडी युनियनचा बोगस पदाधिकारी अटकेत, बांधकाम व्यवसायिकांकडून मागितली खंडणी

Thane Crime: माथाडी युनियनचा पदाधिकारी, अशी ओळख सांगत त्याने पैशांची मागणी केली.

सकाळ वृत्तसेवा

Navi Mumbai: मुंबई - माथाडी युनियनचा पदाधिकारी असल्याचे भासवून मुंबई महानगर प्रदेशातील व्यापारी, व्यावसायिकांकडून खंडणी उकळणाऱ्या मुबीन शेख(२३) या पोलीस अभिलेखावरील अट्टल गुन्हेगारास गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या. त्याच्याविरोधात मुंबई, ठाणे, नवी मुंबईत असंख्य गुन्हे नोंद आहेत.

गेल्या आठवड्यात मुबीन नरिमन पॉईंट येथील सीआरटू मॉलमध्ये धडकला. पहिला मजल्यावर वर्ल्ड ऑफ वाइन या नवीन दुकानाचे काम सुरू होते. तेथील मजुरांन

पैसे न दिल्यास हॉटेल जाळू , तोडफोड करू, अशी धमकी देत मजुरांना मारहाण केली. भीतीपोटी एका मजुराने हजार रुपये मुबीनच्या हातावर ठेवले. दुकान मालकाने जेव्हा प्रकरण समजावून घेण्यासाठी संपर्क साधला तेव्हा मुबीनने ५० हजार रुपयांची मागणी केली.

दुकान मालकाने या प्रकरणी मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणाचा समांतर तपास गुन्हे शखेकडून सुरू होता. तांत्रिक तपासाआधारे गुन्हे शाखेच्या पथकाने मुबीनला वांद्रे येथील दंडाधिकारी न्यायालय परिसरातून अटक केली.

खरदांडा परिसरात राहणारा मुबीन राज्यातील एकाही माथाडी संघटनेचा सदस्य नाही. मात्र त्याने तसे भासवत महानगर प्रदेशातील अनेक बांधकाम व्यवसायिक, व्यापाऱ्यांकडून खंडणी उकळली होती. त्याच्याविरोधात मुंबईतील सांताक्रूझ, माटुंगा, टिळक नगर, गावदेवी या पोलीस ठाण्यांत खंडणी, फसवणुकीचे सहा गुन्हे नोंद आहेत. याव्यतिरिक्त ठाणे आणि नवी मुंबईतही मुबीनविरोधात गुन्हे नोंद असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली आहे. गुन्हे शाखेने पुढील तपासासाठी मुबीनला मरीन ड्राईव्ह पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT