mumbai crime police marathi news Sakal
मुंबई

Mumbai Crime: लग्नासाठी मागे लागली म्हणून प्रियकराने प्रेयसीला केली मारहाण

सकाळ डिजिटल टीम

Mumbai Crime: लग्नाचा तगादा लावल्याने प्रियकराने महिलेला मारहाण केल्याची घटना मालवणी येथील एमएचबी कॉलनीत बुधवारी घडली. पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपींचा शोध सुरू आहे.

एमएचबी कॉलनीत राहणाऱ्या एका महिलेचे वासिम शेख याच्याशी संबंध होते. वासिम हा विवाहित आहे. बुधवारी (ता. १५) महिला आरोपीच्या दुकानात गेली होती. तिथे जाऊन तिने लग्न करण्यासाठी आरोपीकडे विचारणा केली. आरोपीने लग्नास नकार दिल्याने दोघांमध्ये वाद झाला. तेव्हा वासिम शेख याने शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप महिलेने केला आहे.

त्या दरम्यान, वासिम याची आई, बहीण आणि पत्नी त्या ठिकाणी आल्या. त्यांनीही महिलेला मारहाण केली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पीडित महिलेची आई तिला वाचवण्यासाठी आली असता तिलाही मारहाण करण्यात आली. त्यानंतर महिलेच्या भावाने तिला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केले, अशी माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT