mumbai Crime Branch arrested criminal who cheated in name of former Energy Minister Nitin Raut
mumbai Crime Branch arrested criminal who cheated in name of former Energy Minister Nitin Raut  esakal
मुंबई

माजी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या नावाने फसवणूक करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला मुंबई क्राइम ब्रँचकडून अटक

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : माजी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा नातेवाईक ऊर्जा विभागात सरकारी नोकरी देण्याची हमी देत तरुणांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिस गुन्हे शाखेच्या युनिट १२ पथकाने एका आरोपीला अटक केली आहे. संदीप कृष्णा राऊत असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, तो सातारा जिल्ह्यातील रहिवासी आहे. आरोपी मुंबईतील एका गेस्ट हाऊसमध्ये तळ ठोकून कारवाया करत होता. अटक आरोपीविरोधात फसवणुकीचे दोन डझनहून अधिक गुन्हे मुंबईतच नव्हे तर महाराष्ट्रातील विविध पोलीस ठाण्यात दाखल आहेत.

ऊर्जा विभागात नोकरीचे आश्वासन

अटक करण्यात आलेला आरोपी हा स्वत:ला माजी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा नातेवाईक असल्याचे सांगत राज्य सरकारच्या ऊर्जा विभागात सरकारी नोकरी मिळवून देण्याच्या नावाने तरुणांची लाखो रुपयांची फसवणूक करून फरार झाला होता. गुन्हे शाखेकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने आतापर्यंत शेकडो तरुणांना आपल्या जाळ्यात अडकवले आहे, तर या आरोपीचा ऊर्जामंत्री नितीन राउत यांच्याशी काहीही आणि कोणाचाही संबंध नाही. आरोपींकडून बनावट नियुक्ती पत्र, ओळखपत्र, रबर स्टॅम्प, वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र, दोन मोबाईल आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला 25 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदींचं PM पद ते बारामतीचा खासदार कोण? पुण्याच्या ज्योतिषाचं मनमोहन सिंग यांच्याबद्दलचही भाकीत ठरलं होतं खरं

Elon Musk EVM : इलॉन मस्क विरुद्ध भारतीय EVM; भाजपा नेत्यानं दिलं सडेतोड प्रत्युत्तर,जाणून घ्या काय आहे प्रकरण

T Raja Singh: "...तर यंदा भारत हिंदूराष्ट्र घोषित झाला असता," 400 पारच्या नाऱ्यावर काय म्हणाला भाजपचा कट्टर आमदार

Latest Marathi News Live Update : भोपाळमध्ये शिवराज सिंह चौहान यांचं जंगी स्वागत

Ganga River: अंत्यसंस्कारानंतर स्नानासाठी जाताना दुर्घटना! गंगा नदीत बोट उलटल्याने ५ जण बुडाले, माजी NHAI अधिकाऱ्याचाही समावेश

SCROLL FOR NEXT