Breaking News  Sakal
मुंबई

Fake Marksheet: दहावी-बारावीच्या फेक मार्कशीट! 4,000 रुपयांना विकलं जात होतं प्रमाणपत्र; रॅकेट उध्वस्त

टोळीतील चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : दहावी-बारावीच्या फेक मार्कशीटचा बाजारही आता सुरु झाला आहे. याचं एक रॅकेट मुंबई पोलिसांनी उद्ध्वस्त केलं असून चार जणांना अटक केली आहे. कोर्टानं या आरोपींना १८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. (Mumbai Crime Branch busted gang selling fake class 10th 12th marksheets in Chembur)

पोलिसांच्या माहितीनुसार, मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट ६ कडून दहावी-बारावीची बनावट मार्कशीट विकणारी टोळी उद्ध्वस्त करण्यात आली आहे. चेंबूर भागात ही कारवाई करण्यात आली असून या टोळीतील चार जणांना अटक करण्यात आली आहे. या टोळीकडून एक मार्कशीट ४००० रुपयांना विकली जात होती.

सलमान खान, मोहम्मद नदीम शेख, मोहम्मद मुर्तुजा, दानी खान या चार जणांना पोलिसांनी अटक केली असून त्यांना बुधवारी कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टात सुनावणी पार पडल्यानंतर कोर्टानं या चौघांनाही १८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

दरम्यान, चौकशीदरम्यान महत्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे. या टोळीकडून किती लोकांनी अशा प्रकारचे बनवाट प्रमाणपत्र बनवून फसवणूक करण्याचा प्रयत्न केला आहे, हे देखील लवकरच समोर येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Crime : हमाल नेत्याच्या नातवाचा गोळ्या घालून खून; रेल्वे मालधक्का ठेक्याच्या वादातून कुख्यात गुंडाचे कृत्य

Congress NCP Merger: काँग्रेसकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीला विलीनीकरणाचा प्रस्ताव?, तीन आमदार भाजपच्या वाटेवर?

Walchandnagar News : लासुर्णेच्या पृथ्वीराज मुळीक याचे सैन्यदलात भरतीचे स्वप्न साकार; लेफ्टनंटपदाच्या प्रशिक्षणासाठी झाली निवड

RBI च्या निर्णयाचा परिणाम! SBI आणि बँक ऑफ बडोदाकडून व्याजदरात वाढ; पण कोणत्या आणि किती?

गिग वर्कर्ससाठी मोठी खुशखबर! नवीन e-Shram पोर्टल झालं सुरू; २१ जूनपर्यंतच करता येणार नोंदणी, पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

SCROLL FOR NEXT