Crime Sakal
मुंबई

Mumbai Crime : मेहुण्यांनी केला भावोजीवर हल्ला! हळदी समारंभातच झाला राडा; वऱ्हाडींचा काढता पाय

सकाळ डिजिटल टीम

डोंबिवली - हळदी समारंभ आटोपून वऱ्हाडी मंडळी जेवण करत होती. तेवढ्यात दोघा मेहुण्यांनी जेवण करीत असलेल्या भावोजींना लाकडी दांडक्याने तसेच फायटरने मारहाण करण्यास सुरुवात केली.

मंडपातच सुरु झालेल्या या हाणामारीने इतर वऱ्हाडींनी मंडपातून पळ काढला. कल्याण पश्चिमेतील शहाड येथील धाकडे गावात रविवारी रात्री ही घटना घडली आहे. याप्रकरणी खडकपाडा पोलिस ठाण्यात हल्लेखोर मेहुणे नारायण पाटील व राजेश पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गौतम भंडारी (वय 52) हे या हल्ल्यात जखमी झालेल्या भावोजींचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार गौतम हे आंबिवली वडवली गावात रहाण्यास आहेत. ते एक जिम ट्रेनर आहेत. त्यांचे मेहुणे हे देखील याच गावातील राहणारे आहेत. गौतम यांची भाची सायली हीचा रविवारी हळदी समारंभ शहाड येथील धाकडे परिसरात होता.

या हळदीला गौतम व त्यांचे दोन्ही मेहुणे नारायण व राजेश हे सहभागी झाले होते. एकीकडे हळदीचा कार्यक्रम मंडपात सुरू होता. तर दुसरीकडे एका मंडपात जेवणाची पंगत बसली होती. त्याच सुमारास रात्री 8.30 वाजता गौतम हे जेवणाच्या मंडपात जेवण करत होते.

यावेळी त्यांचे मेहुणे तेथे आले आणि काही समजण्याच्या आत त्यांनी गौतम यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. नारायण याने फायटरने गौतम यांना मारण्यास सुरुवात केली तर राजेशने लाकडी दांडक्याने, लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.

या मारहाणीमुळे मंडपात एकच गोंधळ उडाला. निमंत्रीत वऱ्हाडींनी तेथून काढता पाय घेतला. या मारहाणीत गौतम हे गंभीर जखमी झाले असून काही नातेवाईकांनी त्यांना जवळीलच रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर गौतम यांच्या तक्रारीवरुन खडकपाडा पोलिसांनी नारायण व राजेश यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. हल्ल्याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. तसेच नारायण व राजेश याचा पोलिस शोध घेत आहेत. याचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक एस.ए.गवळी करत आहेत.

त्यांच्या हल्लेखोर मेहुण्यानी येऊन अचानक त्यांच्यावर हल्ला केला. हल्ल्यावेळी हल्लेखोर नारायण याने फायटरने हल्ला केला. तर दुसरा हल्लेखोर राजेशने लाकडी दांडक्याने हल्ला करून लाथाबुक्याने बेदम मारहाण केली. जेवणाच्या मंडपात हल्ला झाल्याचे पाहून निमंत्रित पाहुण्यांमध्ये एकच पळापळ झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loan Waiver Alert: कर्जमाफी की सिबिलवर डाग? ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’ योजनेतील OTS नोंदीमुळे ५६ लाख शेतकऱ्यांच्या पतक्षमतेवर संकट

Neeraj Chopra CWG26: नीरज चोप्राने पाकिस्तानी अर्शद नदीमवर कुरघोडी केली, पण ८४ मीटरचे पात्रता अंतर गाठण्यात अपयशी; फायनलमध्ये पोहोचला की नाही?

School Chicken Biryani: शाळकरी मुलांना मिळणार चवदार चिकन बिर्याणी! तामिळनाडू सरकारचा मोठा निर्णय

सलमान खानने विकला कोट्यवधींचा फ्लॅट; तरीही हातात पडला फक्त 'एवढाच' नफा!

Latest Marathi News Live Update : खड्ड्यांमुळे नाशिकमध्ये पाच जणांचे बळी, प्रशासनाला आली जाग

SCROLL FOR NEXT