mumbai crime 
मुंबई

Mumbai Crime: राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षाची हत्या, भायखळा परिसरातील म्हाडा कॉलनीच्या मागे धारदार शस्त्राने हल्ला

Byculla taluka president of NCP sachin kurmi Died: भायखळा परिसरातील म्हाडा कॉलनीच्या मागे त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला झाला होता. यात त्यांचा मृत्यू झाला आहे.

कार्तिक पुजारी

Mumbai Crime: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या तालुकाध्यक्षावर हल्ला करण्यात आला आहे. यात तालुकाध्यक्ष सचिन कुर्मी यांचा मृत्यू झाला आहे. भायखळा परिसरातील म्हाडा कॉलनीच्या मागे त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला झाला होता. यात त्यांचा मृत्यू झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री साडेबारा वाजताच्या दरम्यानची ही घटना आहे. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले होते. यावेळी सचिन कुर्मी हे जखमी अवस्थेमध्ये पडले होते. त्यानंतर त्यांना पोलिसांच्या गाडीतूनच जेजे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. या ठिकाणी डॉक्टरांनी कुर्मी यांना मृत घोषित केलं. त्यांचे पोस्टमार्टम केले जात आहे.

सचिन कुर्मी यांच्यावर कोणी आणि कशासाठी हल्ला केला हे अद्याप समजू शकलेलं नाही. पण, आपापसातील वादातून ही हत्या झाल्याची प्राथमित माहिती आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. सदर घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. शिवाय, या हत्येमुळे त्यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत. आरोपींना तात्काळ पकडण्याची मागणी होत आहे. याप्रकरणी पुणे काय कारवाई होते हे पाहावं लागेल. अद्याप याप्रकरणी कोणतीही अटक झालेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: दिवाळीत शेअर बाजारात जोरदार वाढ; निफ्टी-सेन्सेक्स तेजीत, बँक निफ्टीने गाठला विक्रमी उच्चांक

Diwali 2025: हिंदू शास्त्रांनुसार 'या' 4 रोपांजवळ दिवा लावल्यास वाढते सौभाग्य

IND vs AUS : 'अरे, बॉलिंगवर पण लक्ष द्या'! आर अश्विन संतापला, गौतम गंभीरच्या रणनितीचे केले पोस्टमॉर्टम Video

Gold Price Today: दिवाळीच्या मुहूर्तावर सोन्या–चांदीच्या भावात घसरण; पुढील काही महिन्यांत 1.5 लाखांचा आकडा गाठणार?

Pune Crime : पुण्यात ऐकावे ते नवलच! दिवाळीनिमित्त फायटर कोंबड्यांची पैशांवर झुंज; सहा आरोपींना अटक, पाच लाखांचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT