Mumbai Crime  
मुंबई

Mumbai Crime : ग्रँट रोड तिहेरी हत्याकांड प्रकरणात आरोपपत्र दाखल; 72 साक्षीदारांची साक्ष

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : ग्रॅण्ट रोडच्या पार्वती मेन्शनमधील तिहेरी हत्येप्रकरणी डी.बी. मार्ग पोलिसांनी शनिवारी आरोपी चेतन गालाविरोधात 364 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेता प्रकरणाचा खटला सत्र न्यायालयात वर्ग होणार आहे.

शेजाऱ्यांनी कान भरल्यामुळे पत्नी आपल्याला सोडून गेल्याच्या रागातून आरोपी चेतन गालाने यावर्षी 24 मार्चला शेजारी राहणाऱ्या पाच व्यक्तीवर चाकूहल्ला केला होता. या हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाला होता. एका महिलेवर आरोपीने तब्बल 30 ते 32 वार केले होते.

आरोपीने केलेल्या हल्ल्यात शेजारी जयेंद्रभाई मिस्त्री आणि ईलाबाई मिस्त्री या वृध्द दाम्पत्यासह 18 वर्षांच्या जेनील ब्रह्मभट हिचाही मृत्यू झाला होता. याशिवाय या हल्ल्यात जेनीलची आई स्नेहल ब्रह्मभट व प्रकाश वाघमारे गंभीर जखमी झाले होते.

72 साक्षीदारांची साक्ष

तिहेरी हत्ये प्रकरणी पोलिसांनी 364 पानांचे आरोप पत्र दाखल केलेलं आहे. आरोपपत्रामध्ये एकूण 72 साक्षीदारांची साक्ष असून 2 साक्षीदारांची साक्ष सीआरपीसी कलम 164 अंतर्गत महानगर दंडाधिकाऱ्यांसमोर नोंदवण्यात आली आहे. याशिवाय आर्थर रोड तुरुंगात चेतन गालाची ओळख परेड घेण्यात आली होती. त्यातही साक्षीदाराने आरोपीला ओळखले आहे. हत्येत वापरण्यात आलेला चाकू पोलिसांनी पंचनाम्यानंतर जप्त केला होता. तपासात तो चाकू आरोपीने पायधुनी परिसरातून 240 रुपयांना खरेदी केल्याचे निष्पन्न झाले आहे.

घटनेचा व्हिडिओ/ मोबाईल लोकेशन पुरावे

मोबाइल टॉवर लोकेशननुसार आरोपी चाकू खरेदी करताना पायधुनी परिसरात असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे या दाव्याला आणखी बळकटी मिळाली आहे. घडलेल्या या घटनेचे चित्रीकरण काही पादचाऱ्यांनी त्यांच्या मोबाइलमध्ये केले होते. तेही या आरोपपत्रात पुरावा म्हणून सादर करण्यात आले आहे. याशिवाय इमारतीच्या शेजारी असलेले सीसीटीव्हीचे चित्रीकरणही या आरोपपत्रात सहभागी असल्याचे सूत्रांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO Wage Limit Hike : कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! ईपीएफओची वेतन मर्यादा वाढली; ५१ लाखांहून अधिक जणांना फायदा

Satara Crime : साताऱ्यात दोन गटात हाणामारी, तणावाचे वातावरण; शेवटी २ मंडळांचे केले गणेश विसर्जन, १४ जणांवर गुन्हा दाखल

Team India Update: वरुण चक्रवर्तीच्या जागी आशियाई स्पर्धेसाठी DC चा ऑल राऊंडर; IND vs WI मालिकेत हार्दिक पांड्याचे खेळणे अवघड

मुंबई-नाशिक हायवेवर अपघात, एकाच कुटुंबातल्या चौघांचा मृत्यू, देवदर्शनाहून परतताना २ वर्षांपूर्वी जळालेल्या ट्रकला गाडीची धडक

Marathi News Live Updates : मुंबईतील 'फिल्म सिटी'मधील प्रकल्पासाठी झाडे तोडण्याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारकडून मागितले उत्तर

SCROLL FOR NEXT