Crime news esakal
मुंबई

Mumbai Crime : मुंबई विमानतळावर 13 कोटींची कोकेन जप्त; विदेशी नागरिक अटकेत

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : सीमा शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत परदेशातून भारतामध्ये आलेल्या नागरिकाकडून 1.3 किलो कोकेन जप्त करण्यात आलं आहे. या प्रवाशाने अतिशय शिताफिने हे कोकेन बॅगेमध्ये लपवले होते.

मुंबई एअरपोर्टवर आलेल्या परदेशी नागरिकाची झडती घेतली असता सीमा शुल्क विभागाला त्याच्या बॅगेत लपवलेले अमली पदार्थ सापडले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी कारवाई करत परदेशी नागरिकाला अटक केली .

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई एअरपोर्टवर सीमा शुल्क विभागाने 1 जुलै रोजी ही कारवाई केली. एका परदेशी नागरिकाकडून सुमारे 1.3 किलो कोकेन जप्त झाले. या कोकेनची किंमत 12.98 कोटी रुपये आहे. या प्रवाशाविरोधात कारवाई करत त्याला अटक करण्यात आली आहे. सीमा शुल्क विभागाकडून या व्यक्तीची चौकशी सुरु आहे. हे कोकेन आफ्रिकेच्या आदिस अबाबा येथून भारतात आणण्यात आले होते.

आरोपीने हे अंमली पदार्थ कोणाकडून आणि कोणाला देण्यासाठी भारतात आणले होते याचा तपास सुरु आहे.अटक करण्यात आलेली व्यक्ती नैनितालचा रहिवासी आहे. या व्यक्तीला भारतामध्ये कोकेन आणण्यासाठी एका महिलेने सोशल मीडियाच्या माध्यमातून तयार केलं होतं. सीमा शुल्क विभागाने अटक केलेल्या व्यक्तीने कोकेन आपल्या बॅगेमध्ये लपवले होते. ते बाहेर काढतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Duleep Trophy: तिलक वर्मा ९९ धावांवर आऊट अन् मग वैभव सूर्यवंशी, ईशान किशनसह पूर्व विभागानं जे केलं, त्यानं जिंकली कोट्यवधींची मनं!; Video

CSMT Redevelopment : सीएसएमटीचा ‘वर्ल्ड हेरिटेज’ दर्जा; पुनर्विकासाने मात्र रेल्वेचीच कोंडी! प्लॅटफॉर्म १६-१७ सात महिन्यांपासून बंद, आता १४-१५ ताब्यात देण्याची मागणी

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री झाल्यानंतर विजय यांचा पहिलाच परदेश दौरा

MLA Manoj Kayande : सिंदखेड राजा मतदारसंघांमध्ये कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

Pune News : विद्यानंद बापट हल्ला प्रकरणातील संतोष चव्हाणचा जामीन न्यायालयाने फेटाळला

SCROLL FOR NEXT