Crime News 
मुंबई

Mumbai Crime : जय श्री राम बोलण्यास भाग पाडत दलित तरुणाला मारहाण; मुंबईतील घटना

रवींद्र देशमुख

मुंबई - देशात याआधी अनेकदा धार्मिक घोषणाबाजी कऱण्यावरून हिंसेच्या घटना घडल्या आहेत. मात्र महाराष्ट्रात अशी घटना घाडली नव्हती. मात्र मुंबईत एका दलित तरुणाला धार्मिक घोषणा देण्यास भाग पाडत मारहाण केल्याचं समोर आलं आहे.

कांदिवलीत एका दलित तरुणची वाट अडवून त्याला जय श्री राम बोलण्यास भाग पाडत सहा तरुणांनी मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. २५ सप्टेंबरच्या रात्री तक्रारदार हे कांदिवलीतून रात्री उशिरा घरी परतत असताना गोकुळ नगर येथे या टोळक्यांनी तक्रारदाराची वाट अडवली होती.

त्यानंतर या टोळक्याने तक्रारदारावर जय श्री राम बोलण्यासाठी दबाव टाकला. तक्रारदार जय श्री राम बोलत नाही म्हणून त्याला हिनवत मारहाण केली. वेळीच तक्रारदारांचा भाऊ घटनास्थळी पोहोचला. त्याने मारहाण झालेल्या तरुणाला उपचाराकरिता जवळच्या रुग्णालयात दाखल केले. तक्रारदारांनी नोंदवलेल्या तक्रारीनंतर कांदिवली पोलिसांनी चौघांविरोधात कलम ३२३, ३४१, ५०४, ५०६, ३४ भादवी अंतर्गत गुन्हा दाखल केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Insurance Sector: मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक! १००% FDI ला मंजुरी; इंश्योरन्स क्षेत्रात मोठा धमाका, पण LIC साठी नियम वेगळे

रितेश देशमुखने घेतलं पुण्याच्या दगडूशेठ गणपतीचं दर्शन, म्हणाला...'माझे वडिल विलासराव देशमुख यांना...' Viral Video

nasrapur case updates: 'माझ्या मुलीला न्याय मिळेपर्यंत.. पीडित मुलीच्या वडिलांची संतप्त प्रतिक्रिया...

Pune ATS Arrest: येरवडा जेलमधून पळाल्यानंतर ६ वर्षे फरार राहिलेला मोक्का आरोपी अजिंक्य कांबळे एटीएसच्या सापळ्यात

Latest Marathi News Live Update : नीलम गोऱ्हे यांची सोशल मीडियावरील गैरवापराबाबत तीव्र प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT