Mumbai Crime 
मुंबई

Mumbai Crime : 'फ्लिपकार्ट'ला लावला सव्वा लाखांचा चुना; आरोपी डिलीव्हरी बॉयला पोलिस कोठडी

सकाळ डिजिटल टीम

अधेरी - डिलीव्हरीनंतर ग्राहकांकडून देण्यात आलेले पेमेंट कंपनीत जमा न न करता पळून गेलेल्या एका डिलीव्हरी बॉयला एमएचबी पोलिसांनी अटक केली. शैलेश सुहास दिघसकर असे या ४० वर्षीय आरोपीचे नाव असून तो फ्लिपकार्ट कंपनीचा कर्मचारी आहे.

त्याने यापूर्वीही अशाच प्रकारे तीन ते चार गुन्हे केल्याचे तपासात उघडकीस आले असून या गुन्ह्यांची माहिती काढण्याचे काम सुरु असल्याचे तपास अधिकारी डॉ. दिपक हिंडे यांनी बोलताना सांगितले.

दहिसर परिसरात फ्लिपकार्ट कंपनीचे एक कार्यालय असून तिथे शैलेश हा डिलीव्हरी बॉय म्हणून काम करत होता. १४ मेला त्याला डिलीव्हरीसाठी पंधरा पार्सल देण्यात आले होते. डिलीव्हरीनंतर कार्यालयात आलेला शैलेश हा पार्सल बॅग कार्यालयात ठेवून निघून गेला होता. त्याने डिलीव्हरी केलेल्या पार्सलच्या सुमारे सव्वालाख रुपये कंपनीत जमा केले नव्हते.

ही रक्कम जमा न करता तो पळून गेला होता. हा प्रकार उघडकीस येताच कंपनीच्या मॅनेजरने त्याच्याविरुद्ध एमएचबी पोलिसांत तक्रार केली होती. याप्रकरणी अपहाराचा गुन्हा नोंद होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर कुडाळकर यांच्या पथकाने आरोपीचा शोध सुरु केला होता.

ही शोधमोहीम सुरु असताना गेल्या एक महिन्यापासून फरार असलेल्या शैलेश दिघसकर याला एपीआय डॉ. दिपक हिंडे, पोलीस शिपाई घोडके यांनी मिरारोड येथून येथून अटक केली.

चौकशीत त्यानेच या पैशांचा अपहार केल्याची कबुली दिली आहे. त्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली. पोलीस तपासात शैलेशचे आई-वडिल नसून त्याच्या भावासोबत त्याचा वाद आहे. त्यामुळे त्याचा राहण्याचा पत्ता नसून तो अनेकदा त्याच्या मित्रांकडे राहत होता. विविध कंपनीत त्याने डिलीव्हरी बॉय म्हणून काम केले असून तिथे पैशांसह महागड्या वस्तूचा अपहार केला आहे.

त्याच्याविरुद्ध अशाच तीन ते चार गुन्ह्यांची नोंद आहे. सव्वालाखांच्या कॅशचा अपहारानंतर तो पळून गेला होता. त्याच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा नोंद झाल्याची माहिती त्याला मिळाली होती. त्यामुळे तो महिनाभर बाहेर वास्तव्यास होता.

काही दिवसांपूर्वीच तो स्विगी कंपनीत डिलीव्हरी बॉय म्हणून कामाला लागला होता. ही माहिती प्राप्त होताच पोलिसांनी त्याला स्विगीची ऑर्डर डिलीव्हरी करताना अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: दिलासादायक बातमी! ओसी मिळवण्याची प्रक्रिया सोपी आणि जलद होणार; नवे निकष लागू करणार, पण कोणते?

Pune Traffic Update: पुण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मंगळवारी वाहतुकीत बदल; मार्गांवरील वाहतुकीत तात्पुरते कसे आहेत बदल?

MI vs RCB: पांड्या ब्रदर्समध्ये वाद? कृणालने आधी हार्दिकला बाऊन्सर मारला अन् आऊट होताच असं काही केलं की...

विजय वर्मासोबत मटका किंगमध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री; व्यक्तिरेखेबद्दल म्हणाली..

Hydrogen Cooking Stove India : गॅस किंवा रॉकेलची गरज नाही, चक्क पाण्यावर चालतो 'हा' स्टोव्ह, मात्र किंमत ऐकून बसेल धक्का!

SCROLL FOR NEXT