bar dancer sakal
मुंबई

Mumbai News : चोरट्याचा बारबालेवर जीव जडला...केली 50 लाखांची उधळण, धक्कादायक प्रकार

शर्मिला वाळुंज : सकाळ वृत्तसेवा

Mumbai News : मुंबईतील डान्स बारमध्ये काम करणाऱ्या बारबालेवर युसुफचा जीव जडला होता. त्याने आत्तापर्यंत तिच्यावर 50 लाखांची उधळण देखील केली होती. केवळ तिच्यावरच पैसे उधळण्यासाठी त्याने मित्रांसोबत चोरी करण्यास सुरुवात केली.

मानपाडा पोलिसांनी युसूफ शेख व नौशाद आलम यांना अटक केली असून या दोघांविरोधात ठाणे, नवी मुंबई, मुंबई परिसरातील एकूण 18 गुन्ह्यांची उकल पोलिसांनी केली आहे.

कल्याण डोंबिवली परिसरात घरफोडीचे प्रमाण वाढले आहे. या गुन्ह्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके नेमली होती. कल्याण परिमंडळ 3 चे पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली चोरी, लूट, स्नॅचिंग सारख्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरु केला होता.

डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश मदने, पोलिस अधिकारी सुनिल तारमळे, अविनाश वनवे आणि प्रशांत आंधळे या तीन पोलिस अधिकाऱ्यांच्या पथकाने सीसीटीव्हीच्या सहाय्याने तपास सुरु केला. अखेर पोलिसांना यश आले. पोलिसांनी नवी मुंबईतील घणसोली परिसरात राहणारा यूसूफ शेख आणि त्याचा मित्र नौशादला अटक केली. या दोघांकडून 18 गुन्ह्याची उकल झाली आहे. पोलिसांनी मोठ्या प्रमाणात दागिने, पैसे, लॅपटॉप मोबाईल इतर साहित्य जप्त केले आहे. यूसूफ याला 23 चोरी प्रकरणात या आधी अटक करण्यात आली होती. नौशादलाही 11 चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती.

आरोपी चोरी कशासाठी करायचे हे ऐकून पोलिसही थक्क झाले आहेत. मुंबईतील एका डान्सबारमध्ये काम करणाऱ्या बारबालेवर युसूफचा जीव जडला. तिला खूष करण्यासाठी यूसूफने आत्तापर्यंत 50 लाख उधळले आहेत. नौशाद त्याच्यासोबत जायचा आणि बसायचा. हे दोघेही चोरी केलेले पैसे तिच्यावर उधळायचे.

केवळ तिच्यावर पैसे उधळण्यासाठी यूसूफ त्याचा मित्र नौशादसोबत चोऱ्या करत होता. हे दोघे सराईत गुन्हेगार असून दोघांची जेलमध्ये मैत्री झाली होती. पोलिसांनी या दोघांकडून 20 तोळे सोन्याचे दागिने, सव्वा दोन लाखांची रोकड, दोन बाईक, 2 लॅपटॉप, 8 मोबाईल, 5 महागडी घड्याळ, 1 महागडा कॅमेरा, स्क्रू ड्रायव्हर, चाकू, पक्कड आदी मुद्देमाल हस्तगत केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT